अमळनेर तालुक्यात साकारतोय बायो सीएनजी, पीएनजी, व सेंद्रिय खत निर्मिती प्रकल्प

बातमी शेअर करा...

अमळनेर (प्रतिनिधी)मुंबई येथील मीरा क्लीन फ्यूएल्स व अमळनेर प्रोडूसर कंपनी यांच्या संयुक्त विद्यमाने अमळनेर तालुक्यात जैवइंधन म्हणजेच बायो सीएनजी, पीएनजी व सेंद्रिय खत निर्मिती प्रकल्प साकारणार आहे. या प्रकल्पासाठी सुमारे 50 ते 55 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. भविष्यातील इंधन टंचाईवर मात करून देशातच इंधन तयार करण्यासाठी कंपनीतर्फे पावले उचलली जात आहे. उत्पादक कंपनीच्या माध्यमातून प्रत्येक तालुक्यात एक गॅस प्रकल्प कार्यान्वित होत आहे. शेतीतील टाकाऊ पालापाचोळा, कापसाच्या काडीकचरा गवत व हत्ती गवत यापासून घरगुती, औद्योगिक व वाहनांच्या अशा तीन प्रकारच्या गॅस व सेंद्रिय खत या प्रकल्पातून तयार होणार आहे. या माध्यमातून शेतकऱ्यांना उत्पन्नाचे नवे स्रोत निर्माण होणार आहे. *ग्रामीण भागात प्रत्येक गावात उद्योजक निर्माण करणे* प्रकल्पाच्या माध्यमातून ग्रामीण स्तरावर प्रत्येक गावात उद्योजक होण्याची संधी निर्माण होणारआहे.
त्यासाठी आज दिनांक १२/०६/२०२२ रोजी नांदेड कर सभागृह अमळनेर येथे MCL ग्रामउद्योग (MVP) मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. मेळाव्यास एम सी एल कंपनीचे सीनियर बीडीए माननीय श्री. योगेश पवार सर यांनी कंपनी विषयी सविस्तर माहिती देऊन यशस्वी ग्रामउद्योगजक होण्याचे आवाहन केले . याप्रसंगी अमळनेर प्रोडूसर कंपनी व मधुसुदन क्लीन fuels कंपनीचे संचालक माननीय डॉक्टर मनोज पाटील सर यांनी मार्गदर्शन केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक पिळोदा येथील ग्रामउद्योजक श्री. योगेश देशमुख यांनी केले मेळाव्यास कंपनी संचालक श्री. नगराज पाटील,हेमंत पवार ग्राम उद्योगजक श्री. भाऊसाहेब पाटील श्री.अतुल पाटील तसेच चांगल्या संख्येने नवीन ग्राम उद्योगजक उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी कार्यालयातील कर्मचारी विकास पाटील यांनी चांगले परिश्रम घेतले

BJP add
बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम