धार येथे उल्लेखनीय विकास कामांचे आ.अनिल पाटलांच्या हस्ते भूमीपूजन -गावासाठी निधी कमी पडू देणार नाही-आ.अनिल पाटील

बातमी शेअर करा...

अमळनेर-(आबिद शेख)तालुक्यातील धार येथे विविध उल्लेखनीय विकासकामांचे भूमिपूजन मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार अनिल भाईदास पाटील आणि जि. प.सदस्या जयश्री अनिल पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी आमदारांनी आपल्या भावना व्यक्त करताना या गावासाठी निधी कमी पडू देणार नाही अशी ग्वाही देत गावात ज्या ज्या समस्या असतील त्या सोडविण्यासाठी मी कटिबद्ध असल्याची ग्वाही दिली तर जि प सदस्या सौ जयश्री पाटील यांनीही जि प च्या माध्यमातून आवश्यक ती कामे देण्याची ग्वाही दिली,यावेळी ग्रामस्थांनी दोघांचेही जल्लोषात स्वागत करून सत्कार केला यावेळी राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष सुरेश पाटील,सरपंच दगडू रुजू सैंदाणे, उपसरपंच शशिकांत पाटील, माजी सरपंच गणेश पाटील, सुभाष पाटील, शेतकी संघ प्रशासक सदस्य अलीम मुजावर, भानुदास पाटील, अरुण पाटील, सत्तार मुजावर, प्रवीण सैंदाणे, दीपक सैंदाणे, चतुर निकम, भगवान पाटील, प्रमोद पाटील, यशवंत पाटील, लहू निकम, अँड सतीश सैंदाणे, संजय सैंदाणे, बिलाल सैंदाणे, संजय सैंदाणे, राज टेलर, राजेंद्र पाटील, दिलीप पाटील, उमाकांत भाऊसाहेब, रफा मुजावर, रज्जाक शाह, सौगंध भिल, लटकन पाटील, संजय पाटील, मनोहर पाटील, मंगल सैंदाणे, यांच्या सह ग्रामस्थ मंडळ, पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

*या कामाचे झाले भूमिपूजन*

आमदार निधीतुन नव बौद्ध वस्तीत सभामंडप बांधणे. रक्कम रु.15 लक्ष,आमदार निधीतुन- धार ते खापरखेडा रस्ता खडीकरण करणे, रक्कम रु. 10 लक्ष ,जि.प.स्तर शेष धार ते खापरखेडा खडीकरण करणे रक्कम रु.4 लक्ष,जि.प.स्तर-दलित वस्तीत काँक्रेटिकरण करणे. रक्कम रु. 10 लक्ष, जि. प.शेष हायमस लॅम्प बसविणे- रक्कम रु. 1.50 लक्ष,जि.प.शेष स्मशानभूमी जवळ काँक्रेटिकरण करणे, रक्कम रु.1.50 लक्ष,जि. प.शेष- गुरांसाठी पाणी पिण्यासाठी हाव बांधणे- रक्कम रु.1.50 लक्ष,आमदार निधीतुन- सभामंडप बांधणे रक्कम रु. 7 लक्ष,जि.प.शेष- शवपेटी पुरवणे रक्कम रु. 1 लक्ष, जि.प.शेष- दलित वस्तीत शौचालय बांधणे रक्कम रु 5 लक्ष

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम