अमळनेर येथील मुंदडा ग्लोबल स्कूल मध्ये २८ राज्याचे प्रदर्शन उत्साहात संपन्न. -शाळेच्या पालकांना एकाच ठिकाणी सर्व राज्याचे घडले दर्शन

बातमी शेअर करा...

अमळनेर(आबिद शेख)शहरातील मुंदडा फाऊंडेशन संचलित श्री. एन. डी. मुंदडा ग्लोबल व्ह्यू स्कूल येथे दिनांक १० ऑगस्ट २०२२ रोजी भारताच्या स्वातंत्रदिनाच्या अमृत महोत्सवानिमीत् अतुल्य भारत अंतर्गत २८ राज्यांचे भव्यदिव्य प्रदर्शन भरविण्यात आले होते,या प्रदर्शनाचे उद्घाटन नगर परिषदेचे मुख्याधिकारी श्री प्रशांत सरोदे यांच्या हस्ते फीत कापुन व दिपप्रज्वलनाने करण्यात आली.तसेच या प्रदर्शनात प्रत्येक राज्याची असलेली परंपरा, तेथील खाद्यपदार्थ, तेथील पेहराव, त्या राज्याचे संगीत, तेथील संस्कृती, तेथील प्रसिध्द असलेली मंदीरे, मुर्ती धार्मिक स्थळे इत्यादी विषयीची माहीती व हुबेहुन देखावे सादर करण्यात आले होते. त्यामुळे शाळेच्या पालकांना इथेच सर्व राज्यांचे दर्शन घडले. सदर प्रदर्शनास पालकांचा उत्स्फूर्तपणे प्रतिसाद लाभला.पालकांनी अतिशय सुंदर अतुलनीय अशी वेगळी संकल्पना आपल्या शाळेने दिली. व त्यामुळे आमच्या पाल्यांना व विद्याथ्र्यांना विविध राज्यांच्या परंपरेची व संस्कृतीची माहिती मिळाली, त्यामुळे शाळेचे आभार मानले व आपली शाळा नेहमीच काहीतरी वेगळ करत असते अशा प्रकारच्या प्रतिक्रीया यावेळी दिल्या.
सदर प्रदर्शन हे संपुर्ण जळगाव जिल्हयात नंबर वन ठरेल अशा प्रतिक्रीया देखिल दिल्या. सदर कार्यक्रमास अमळनेर पंचायत समितीतील गटशिक्षणाधिकारी सौ. चव्हाण मॅडम यांनीही भेट देवून शाळेचे प्राचार्य, प्राचार्या, सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थ्यांचे कौतुक केले.
सदर कार्यक्रमासाठी शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी यांनी परिश्रम घेतले,
सर्व शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी न विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष श्री ओमप्रकाशजी मुंदडा, चेअरमन सौ. छायाभाभी मुंदडा, सहसचिव श्री. योगेश मुंदडा, सचिव श्री अमेय मुंदडा, अॅडमिनीस्ट्रेटर सौ. दिपीका अमेय मुंदडा, श्री. गरेंद्र मुंदडा. श्री. राकेश मुंदडा, श्री पंकज मुंदडा, सर्व पदाधिकारी यांनी शाळेचे प्राचार्य श्री लक्ष्मण पर प्रायमरी प्राचार्या सौ. निद्या मॅडम, प्रि-प्रायमरी को-ऑडीनेटर सौ. योजना ठक्कर, सर्व शिक्षिक-शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी यांनी कौतुक केले व आभार मानले

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम