भाऊजायीचा विनयभंग करून जाळून टाकण्याचा प्रयत्न करणाऱ्या पोलिसाचा न्यायालयाने नाकारला जामीन

बातमी शेअर करा...

गंभीर गुन्हा करूनही आरोपी मोकाट कसा?पीडितेच्या नातेवाईकांचा सवाल

अंमळनेर (प्रतिनिधी )चोपडा भावाकडे नांदायला आली म्हणून सख्ख्या भावजयीस गंभीर मारहाण व विनयभंग करून पेट्रोल टाकून जाळून टाकण्याचा प्रयत्न करणाऱ्या पेशाने पोलीस असणाऱ्या आरोपी जेठचा अटकपूर्व जामीन अमळनेर जिल्हा सत्र न्यायालयाने फेटाळून लावला आहे.
अनंत राजाराम चौधरी,रा.मल्हारपुरा,चोपडा शहर असे आरोपी पोलिसाचे नाव असून तो सध्या जळगाव जिल्हा पोलिस दलात कार्यरत आहे,सदर आरोपीवर पीडित महिला सौ शितल प्रकाश चौधरी हिने चोपडा शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून दि 7 मे 2022 रोजी भादवी कलम 307,354,354 ब,323,504 आणि 506 प्रमाणे गंभीर गुन्हे दाखल असून गुन्ह्याचा तपास पोलीस करीत आहेत,मात्र एवढ्या गंभीर गुन्ह्यातही आरोपीस अटक न होता तो मोकाट फिरत असल्याने पोलिसांच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.या गुन्ह्याची हकीकत अशी की अमळनेरचे माहेर असलेली पीडित महिला चोपडा मल्हारपुरा येथे पती प्रकाश राजाराम चौधरी आणि सासू सासरे आणि मुलगा व मुलगी यांच्या सोबत एकत्रित कुटुंबात राहते,पती शेती व्यवसाय करतात तर जेठ पोलीस अनंत राजाराम चौधरी हे कार्यरत असताना अधून मधून घरी येत असतात दरम्यानच्या काळात सासरी पती व जेठच्या त्रासाला कंटाळून पीडित महिला 1 वर्ष माहेरी अमळनेरात होती,त्यानंतर समाजातील प्रतिष्ठित मंडळी व नातेवाईकांच्या मध्यस्थीने समजोता झाल्याने पीडित महिला दि 5 मे 2022 रोजी चोपडा येथे सासरी नांदावयास आली होती,मात्र त्याच दिवशी सायंकाळी आरोपी जेठ अनंत चौधरी व जेठाणी सौ मनीषा चौधरी हे घरी आले असता अनंत चौधरीने तू या घरात कशीकाय आली,तुला कुणी येऊ दिले,शिवीगाळ करीत अंगावरील साडीचा पदर ओढुन मारहाण केली,तसेच जमिनीवर आडवी पाडून लाथानी पोटात मारहाण केली,त्यानंतर तीने घरातून निघण्यास नकार दिल्याने बाटलीमधील पेट्रोल तिच्या अंगावर ओतून तुला जिवंत सोडणार नाही अशी दमदाटी केली,आणि घरात माचीस आणण्यासाठी गेले, जाळून टाकण्याचा प्रयत्न असताना पीडित महिला मुलीसह बाहेर पळत आल्याने जेठणी मनीषा चौधरी यांनी आरोपी पतीस आवरले,सदर घटना महिलेने माहेरी कळविल्यानंतर ते तात्काळ चोपडा येथे पोहोचले,तेथे उपजिल्हारुग्णालयात उपचार घेतल्यानंतर चोपडा पोलिसात फिर्याद दाखल केली.
गुन्हा दाखल होऊनही आरोपीस इतके दिवस अटक न होता तो मोकाट होता,त्याने अमळनेर जिल्हा सत्र न्यायालयात दाखल केलेला अटकपूर्व जामीन अर्ज क्रमांक 172/2022 न्यायालयाने फेटाळून लावला असून आतातरी पोलिसांनी अटक करून पीडित महिलेस न्याय द्यावा अशी मागणी तिच्या नातलगांनी केली आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम