
श्री महाराणा प्रताप जयंतीनिमित्त 2 जूनला अमळनेरात महापूजन व जलोष कार्यक्रम
अमळनेर (प्रतिनिधी )-शहरात सालाबादाप्रमाणे यंदाही गुरुवार दि.2 जून रोजी हिंदु सूर्य वीर शिरोमणी श्री महाराणा प्रतापसिंह यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात येणार असून त्याची जय्यत तयारी सुरू आहे.
यादिवशी शहरातील श्री महाराणा प्रताप चौकातील स्मारकस्थळी उत्कृष्ठ सजावट करून सायंकाळी 6 वाजता सर्व लोकप्रतिनिधी आणि राजकीय व सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांचे हस्ते महापूजन करण्यात येणार आहे,तसेच याचवेळी बँड पथकाच्या तालावर मोठा जल्लोष साजरा करून आतिषबाजी करण्यात येणार आहे,यावेळी सर्व राजपूत समाजबांधव आणि महाराणा प्रताप प्रेमी पारंपरिक पोशाखात (कुर्ता पायजमा,फेटा परिधान करून सहभागी होणार आहेत,राणाजींची मिरवणूक जागेवरच असली तरी जल्लोष मात्र त्याच थाटात होणार आहे.तरी राणाजींचा जन्मोत्सव उत्साहात साजरा करण्यासाठी अमळनेर शहर व ग्रामिण भागातील सर्व राजपूत समाजबांधव,श्री महाराणा प्रताप प्रेमी आणि विशेष करून महिला भगिनी आणि तरुणांनी सहपरिवार कार्यक्रमास उपस्थित राहावे असे आवाहन अमळनेर तालुका राजपूत समाज पंच मंडळ,आणि श्री महाराणा प्रताप जयंती उत्सव समिती,अमळनेर तर्फे करण्यात आले आहे.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम