राजस्थानात मतदानाला सुरुवात ; सकाळी ९ वाजता ९ टक्के मतदान !
बातमीदार | २५ नोव्हेबर २०२३
देशात आगामी लोकसभेची जय्यत तयारी सुरु असून त्यापूर्वी आता राजस्थान विधानसभेच्या १९९ जागांसाठी मतदान होत आहे. मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सकाळी 9 वाजेपर्यंत राज्यात 9.77 टक्के मतदान झाले. जयपूर आणि जोधपूरसह अनेक शहरांमध्ये सकाळपासूनच लांबच लांब रांगा दिसत आहेत. सीएम अशोक गेहलोत म्हणाले, ‘काँग्रेसच्या विजयानंतर पुढचा मुख्यमंत्री कोण होणार, हे हायकमांड मल्लिकार्जुन खरगे आणि राहुल गांधी ठरवतील. पक्षाने ठरवलेली भूमिका मान्य केली जाईल.
त्याचवेळी वसुंधरा राजे यांनी झालावाडमध्ये मतदान केल्यानंतर प्रत्येकाने मतदान केलेच पाहिजे, असे सांगितले. काँग्रेस नेते सचिन पायलट यांनीही जयपूरच्या सी स्कीममध्ये मतदान केले. विजयाच्या प्रश्नावर अशोक गेहलोत म्हणाले की, आमच्या सरकारने जनतेला दिलेला हमीभाव आणि जो विकास झाला आहे. ते पाहून जनता आमच्या सरकारला पुन्हा निवडून देतील.
या निवडणुकीत एकूण 1863 उमेदवार रिंगणात आहेत. राज्यातील 5 कोटी 26 लाख 90 हजार 146 मतदार त्यांचे भवितव्य ठरवणार आहेत. सायंकाळी ६ वाजेपर्यंत मतदान होणार आहे. 3 डिसेंबरला निकाल लागणार आहे. पाच वर्षांपूर्वी 2018 मध्ये 74.06 टक्के मतदान झाले होते. नेहमीप्रमाणे भाजप आणि काँग्रेसमध्येच मुख्य लढत आहे. राजस्थानमध्ये प्रत्येक वेळी सरकार बदलण्याचा ट्रेंड कायम राहणार की यंदाही ही परंपरा बदलणार हे या निवडणुकीचे निकाल ठरवतील.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम