‘वेड’ बॉक्स ऑफिसवर हिट ; या चित्रपटाच्या पुढे निघाला…
दै. बातमीदार । १५ जानेवारी २०२३ । राज्यात सध्या ‘वेड’ चित्रपटाचे वेद रितेश देशमुखने लावल्याने चाहत्याने हि त्याला मोठी पसंती दिली आहे. मराठी चित्रपटांना पुन्हा एकदा बॉक्स ऑफिसवर हिट करणाऱ्या रितेश देशमुखच्या वेड चित्रपटानं ऐतिहासिक कामगिरी केली आहे. आपल्या नावावर एक वेगळा विक्रम केला आहे.
गेल्या काही दिवसांपासून राज्यभरातील थिएटरमध्ये रितेश देशमुखच्या वेडची हवा आहे. त्याच्या या चित्रपटाला प्रेक्षकांचा जबदस्त प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले आहे. भलेही वेड हा टॉलीवूडच्या चित्रपटावर आधारित असला तरी त्याचा मराठी रिमेक प्रेक्षकांना भावला आहे. त्यामुळेच की काय सध्या सगळीकडे थिएटरमध्ये वेडचं वेडं पाहायला मिळते आहे.
#Marathi film #Ved is now the SECOND HIGHEST GROSSING #Marathi film, after #Sairat… As expected, biz doubles on [third] Sat [vis-à-vis Fri], expect big gains on Sun again… This one refuses to SLOW DOWN… [Week 3] Fri 1.35 cr, Sat 2.72 cr. Total: ₹ 44.92 cr. pic.twitter.com/fTBULiGa8l
— taran adarsh (@taran_adarsh) January 15, 2023
रितेश देशमुख, जेनेलिया, अशोक सराफ अशी मोठी स्टारकास्ट असलेल्या वेडला अजय अतुल यांचे संगीत लाभले आहे. त्यातील गाणी ही सर्वाधिक लोकप्रिय झाली आहेत. नव्या वर्षात रितेशच्या वेड चित्रपटानं केलेली कामगिरी कौतूकास्पद आहे. त्यानं सोशल मीडियावर देखील आपल्या चित्रपटाचे प्रमोशन प्रभावी ठरताना दिसते आहे. आता सर्वात जास्त कमाई करणारा ‘सैराट’ पाठोपाठ ‘वेड’ हा दुसरा चित्रपट म्हणून समोर आला आहे. रितेशच्या वेड चित्रपटानं त्याच्याच काही चित्रपटांचे रेकॉर्ड ब्रेक केले आहेत. त्यात लय भारी चित्रपटाचा उल्लेख करावा लागेल. आतापर्यंत या चित्रपटाने एकूण ४४.९२ कोटींची कमाई केली असून आता लवकरच हा चित्रपट ५० कोटींच्या क्लबमध्ये सहभागी होणार असल्याची चर्चा आहे. सैराटनं एकाच दिवशी जी विक्रमी केली होती तो विक्रम आता वेडनं मोडला आहे. त्यामुळे त्याच्यावर कौतूकाचा वर्षाव होतो आहे. तरण आदर्श जे चित्रपट समीक्षक म्हणून ओळखले जातात त्यांनी दिलेल्या माहितीनुसार हा चित्रपट येत्या काही दिवसांमध्ये आणखी मोठी कमाई करण्याची शक्यता आहे. त्यामुळे अजुन काही विक्रम हे वेडच्या नावावर जमा होणार आहेत. असे म्हटले जात आहे.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम