वाडे-टेकवाडे पुलाच्या काम निकृष्ट पद्धतीने, वाडे ग्रामस्थांचे सार्वजनिक बांधकाम विभागाला निवेदन
भडगाव प्रतिनिधी
तालुक्यातील वाडे-टेकवाडे या गावांना जोडणारा रस्त्यावर पुलाचे काम चालू आहे. त्या पुलाच्या मध्ये मुरुमाची भर न करता आजू बाजूची माती व कचरा या भर म्हणून टाकण्यात येत आहे. तसेच पुलाचे काम निकृष्ट दर्जाचे चालू असल्याचे वाडे ग्रामस्थांनी भडगाव सार्वजनिक बांधकाम विभागाला निवेदन दिले असून ग्रामस्थांच्या वतीने लवकरच उपोषणाचा ईशारा देण्यात आला आहे.
ग्रामस्थांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, वाडे- टेकवाडे या गावांना जोडणारा रस्त्यावर नाला आहे त्यावर पुलाचे काम चालू आहे. सदर पुलाच्या बांधकाम बाजूला मुरूम ने भर करायला पाहिजे होती. मात्र पुलाच्या बाजूला ग्रामपंचायत हद्दीत सबस्टेशन चा रस्ता प्रास्तवित करण्यात आला आहे. या रस्त्यावरील संपूर्ण माती उचलून पुलाच्या बांधकाम साठी वापरण्यात आलेली आहे. प्रास्तविक रस्त्याचे रूपांतर नाल्यामध्ये झालेले असून येणाऱ्या दोन महिन्याच्या काळात रस्त्याअभावी अडचणी निर्माण होतील. संभाव्य धोका लक्षात घेऊन आम्ही सर्व वाडे ग्रामस्थ भडगाव तहसील कार्यालय समोर उपोषणाला बसणार याची नोंद घ्यावी.
या कामा संदर्भात अधिकारी व ठेकेदार यांना वेळोवेळी सूचना देऊनही रस्त्याकडे पुंतः दुर्कलक्ष केलेले आहे. या गोष्टीचा राग मनात ठेऊन सर्व वाडे ग्रामस्थ तीव्र आंदोलनाचा ईशारा देत आहे. पुढील होणाऱ्या परिणामांस आपण स्वतः जबाबदार राहाल असे निवेदनात नमूद केले आहे. या निवेदनावर रामकृष्ण महाजन, निवृत्ती चित्ते, जगदीश महाजन, तेजमल पाटील, देविदास महाजन, आधार महाजन, अशोक माळी, अनंतराव पाटील, देविदास पाटील, विष्णु महाजन, स्वप्नील पाटील, सागर पाटील आदींसह ग्रामस्थांच्या साह्य आहेत निवेदनाच्या प्रती जिल्हाधिकारी जळगाव, सार्वजनिक बांधकाम विभाग जळगाव, तहसिलदार भडगाव यांना पाठविण्यात आले आहे.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम