देशात आणखी पाच दिवस मुसळधार पावसाचा इशारा !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । १९ जुलै २०२३ ।  देशातील काही राज्यात पावसाने हाहाकार माजविला आहे. त्यामुळे अनेकांचे मोठे नुकसान देखील होत असून सध्या दिल्लीत मंगळवारी यमुना नदीच्या पाण्याची पातळी कमी होत असल्याचे दिसून आले. सकाळी 7 वाजता पाण्याची पातळी 205.71 मीटर नोंदवली गेली. दुसरीकडे, पाण्याची पातळी सतत बदलत असल्याने दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल यांनी लोकांना मदत शिबिरात राहण्यास सांगितले आहे.

हवामान खात्याने पुढील ४-५ दिवस दिल्लीत हलका ते मध्यम पाऊस आणि मेघगर्जनेसह पावसाचा इशारा दिला आहे. हवामान खात्याने उत्तराखंडमधील हरिद्वार, मसुरी जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. सोनाली नदीच्या धरणाला तडा गेल्याने उत्तराखंडमधील हरिद्वार जिल्ह्यातील लक्सर शहराला पुराचा धोका आहे. हिमाचलमधील पावसामुळे अयोध्येहून कुल्लूला गेलेल्या एकाच कुटुंबातील 11 जण बेपत्ता आहेत.

कावड यात्रेच्या पार्श्‍वभूमीवर राबविण्यात आलेल्या मार्गाच्या वळणामुळे नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे. शिवरात्रीच्या जलाभिषेकानंतर दिल्ली-मेरठ रोड आणि मेरठ द्रुतगती मार्ग हलक्या वाहनांसाठी खुला करण्यात आला आहे. मध्यम, हलकी वाहने रिंग रोड कॅरेजवेवरून गीता कॉलनी अंडरपासवरून सराई काळे खान येथून आयपी फ्लायओव्हर मार्गे जातील. मुकरबा ते वजिराबाद बाह्य़ रिंगरोड हा मार्ग हलकी वाहने, बसेससाठी खुला करण्यात आला आहे पुढील २४ तासात जम्मू-काश्मीर हिमाचल, उत्तराखंड, पश्चिम उत्तर प्रदेश, हरियाणा, चंदीगड, दिल्ली, पूर्व राजस्थान, पूर्व मध्य प्रदेश, छत्तीसगड, पश्चिम मध्य प्रदेश, गुजरात, गोवा, तेलंगणा, ओडिशा, मध्य महाराष्ट्र, कर्नाटक या राज्यांमध्ये मुसळधार पाऊस पडेल. तसेच बिहार, पश्चिम बंगाल, पंजाब, सिक्कीम, आसाम, मेघालय, आंध्र प्रदेश, पुद्दुचेरी येथे विजांच्या कडकडाटासह हलका पाऊस पडू शकतो. हवामान खात्याने उत्तराखंडमधील हरिद्वार, मसुरी जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. सोनाली नदीच्या धरणाला तडा गेल्याने उत्तराखंडमधील हरिद्वार जिल्ह्यातील लक्सर शहराला पुराचा धोका आहे

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम