आम्हाला राजकारण येत नाही ; आदित्य ठाकरेंनी सांगून दिले !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । २२ जुलै २०२३ ।  राज्यातील शिवसेना फोडून एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यापासून ठाकरे गट शिंदे यांच्यासह त्यांच्या गटातील मंत्र्यांसह आमदारांवर जोरदार टीका करण्याची एकही संधी सोडत नाही. ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे हे आज नाशिकच्या दौऱ्यावर असतांना त्यांनी शिंदे सरकारवर घणाघात केला. ते म्हणाले की, सध्याला देशाची आणि महाराष्ट्राची राजकीय स्थिती अवघड झाली आहे. आपण लढत आहोत. महाविकास आघाडी सरकारच्या काळात महाराष्ट्रात पुढे जात होता, आज कुठं नेऊन ठेवलाय महाराष्ट्र? असा प्रश्न जनतेला पडला आहे.

पुढे बोलतांना आदित्य म्हणाले की, वेदांता फॉक्सकॉन गेल्याने राज्याचं मोठं नुकसान झालं आहे. रोजगार गेला आहे. अनेक प्रकल्प महाराष्ट्रमधून गेले. दारं-खिडक्या उघड्या ठेवल्या असून तिथून सर्व उद्योग राज्याबाहेर जात आहेत. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असते तर गुजरातला उद्योग गेले नसते, ते महाराष्ट्रामध्येच राहिले असते, असा घणाघात आदित्य ठाकरे यांनी केला.”एकीकडे राज्यात फोडाफोडीचं राजकरण सुरु असून कोण आमदार, खासदार कुठून येतो काही कळत नाही. राज्यातील खोके सरकार हे घोषणांचे सरकार आहे. घोषणा केल्या की घटनाबाह्य मुख्यमंत्री आले असे वाटतं. राजकारणाची दलदल झाली आहे. कोण कोणाचे फोटो लावतो ते समजत नाही. आम्ही भोळे आहोत, उद्धव साहेब आणि आम्हाला राजकारण कळत नाही. हा आमचा गुण आहे की अवगुण? हेच कळत नाही. फोफाफोडीच राजकरण आम्हांला समजत नाही.” असेही ते म्हणाले. या देशाच्या आवाज बुलंद करायचा असेल तर आपल्याला एकत्र यावं लागेल. आपल्याला प्रत्येक कोनाकोपऱ्यात फिरावं लागेल. देशात हुकूमशाहीचा राजकारण सुरु आहे. बोललं तरी गुन्हे दाखल होत आहेत. असं शेवटी आदित्य ठाकरे म्हणाले.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम