शरद पवारांचे राज्यात जल्लोषात स्वागत ; प्रतिभाताई झाल्या भावूक !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । ४ जुलै २०२३ ।  राष्ट्रवादीचे नेते अजित पवारांनी शिंदे व फडणवीस यांच्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री पदी शपथ घेतल्यानंतर मोठा धक्का शरद पवारांना बसला होता पण त्यांनी पत्रकार परिषदेत थेट अजित पवारांना आव्हान दिल्याने ते आता राज्याच्या दौऱ्यावर निघाले आहे. विशेष म्हणजे शरद पवार हे लोकांमध्ये जाऊन लोकांना आपलंस करण्याचा प्रयत्न करत आहेत. तर, अजित पवारांच्या निर्णयामुळे कार्यकर्त्यांची चांगलीच गोची झालीय. मात्र, पवारांचा उत्साह पाहून कार्यकर्ता शरद पवारांचे जल्लोषात स्वागत करत आहे.

महाराष्ट्र पातळीवर दोन शिवसेना आणि दोन राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, तर राष्ट्रीय पातळीवर काँग्रेस आणि भारतीय जनता पक्ष आता राज्याचे राजकारण ढवळून काढणार असले तरी ज्येष्ठ नेते शरद पवार यातून तेल लावलेल्या पैलवानासारखे पकडीतून सुटले आहेत. सर्वांपेक्षा अनुभवाने आणि वयाने मोठे असलेले हे पैलवान सर्वांत आधी सोमवारी गुरुवर्यांचे स्मरण करून मैदानात उतरले आहेत. आज पुण्याहून मुंबईकडे येत असताना ठिकठिकाणी शरद पवारांचं मोठं स्वागत करण्यात आलं.
पुण्याहून मुंबईकडे येत असताना त्यांच्या गाडीत शेजारीच पत्नी प्रतिभाताई पवार बसल्या होत्या. शरद पवारांची गाडी नवी मुंबईत आल्यानंतर रस्त्यावरच कार्यकर्त्यांनी गाडीला गराडा घातला. महाराष्ट्राचा बुलंद आवाज, शरद पवार… शरद पवार… असे म्हणत कार्यकर्त्यांनी आम्ही तुमच्यासोबत असल्याचे दाखवून दिले. तसेच, यावेळी, शरद पवारांच्या गाडीवर फुलांची उधळणही करण्यात आली. हस्तांदोलन करण्यासाठी कार्यकर्त्यांनी एकच गर्दी केल्याचं पाहायला मिळालं. शरद पवारांवरील कार्यकर्त्यांचं हे प्रेम पाहून शेजारीच बसलेल्या प्रतिभाताई पवार भावुक झाल्याचं दिसून आलं. एकंदरीत शिवसेनेनंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही मोठी फूट पडली असून ह्या फूटीमुळे काका-पुतण्यात काहीसा दुरावा निर्माण झाल्याचं पाहायला मिळतंय.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम