काय सांगता ! बीअर पिणे ठरू शकते वरदान !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । १६ फेब्रुवारी २०२३ ।देशातील अनेक लोक नियमित मद्यपान करीत असतात याचा अनेक लोकांना त्रास होत असतो तरी मद्यपान बंद होत नाही व ते शरीरासाठी घातक देखील असते. यामुळे अनेक जण मद्यपानापासून दूर राहतात. मात्र, बिअर पिणे शरीरासाठी वरदान ठरू शकते असं कुणी तुम्हाला सांगीतल तर? विश्वास नाही बसणार ना. पण बिअर पिणे शरीरासाठी फायदेशीर ठरू शकते असा दावा संशोधकांनी केला आहे. अनेकांचे बियर हे फेव्हरेट ड्रिंक आहे. यामुळे अनेक जण इतर पेयांपेक्षा बियरचे सेवन करतात. बियर हे देखील एक अल्कोहोलिक पेय आहे.

अनेकांना रोज ड्रिंक करण्याची सवय असते. कोणाला वाइन प्यायची सवय तर कोणाला साधा लेमन ज्यूस पिण्याची सवय असते. तर काही लोकांना वाटते की बिअर आपल्या आरोग्यासाठी खूप हानिकारक आहे. पण, जर तुम्हाला असे वाटत असेल तर ते चुकीचे असेल. कारण बिअर पिण्याचे अनेक फायदे आहेत, पण आपण रोज किती बिअर प्यायली पाहिजे हे बहुतेकांना माहीत नसते. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की बिअरमध्ये अल्कोहोलचे  प्रमाण देखील कमी आहे आणि ते इतर मादक पेयांपेक्षा कमी हानिकारक मानले जाते. सर्वात चांगली गोष्ट म्हणजे बिअर प्यायल्याने अनेक गंभीर आजारांचा धोकाही दूर होतो.

बियरचे हे होतात फायदे
हेल्थलाईनने दिलेल्या रिपोर्टनुसार 355 मिलीच्या बिअरच्या कॅनमध्ये 153 कॅलरी असतात. त्यात मिनरल्स आणि व्हिटॅमिन्सही असतात.
बिअर प्यायल्यामुळे हृदयरोगाचा धोका कमी होत असल्याचंही काही संशोधनांमधून दिसून आलं आहे.
बिअरमध्ये अल्कोहोल असतं, ज्यामुळे रक्तातील साखरेवर काही प्रमाणात नियंत्रण ठेवायला मदत होऊ शकते.
डायबेटिस असणाऱ्या रुग्णांसाठी त्यामुळेच प्रमाणात घेतलेली बिअर ही फायदेशीर मानली जाते.
कमी प्रमाणात बिअरचं सेवन हे महिला आणि पुरुषांची हाडं मजबूत करण्यासाठी उपयुक्त ठरत असल्याचं सांगण्यात येतं.
प्रमाणात घेतलेली बिअर ही डिमेन्शियाचा धोका कमी करते, तर प्रमाणाबाहेर घेतलेल्या बिअरमध्ये हाच धोका कित्येक पटींनी वाढतो.

बिअरमुळे होणारे नुकसान
बिअरमध्ये जास्त अल्कोहोलमुळो माणसाचा लवकर मृत्यू होण्याची शक्यता असते.
वारंवार बिअर प्यायल्यामुळे त्याचं व्यसन जडण्याची शक्यता असते. हे व्यसन आरोग्यासाठी चांगलं नसतं.
जास्त बिअर प्यायल्याने लिव्हर खराब होण्याची शक्यता
बिअरच्या एका कॅनमध्ये 153 कॅलरी असतात. परिणामी वजन वाढू शकतं.
अल्कोहोलच्या सेवनामुळे घसा आणि तोंडाचा कॅन्सर होण्याची शक्यता असते.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम