दै. बातमीदार । १३ एप्रिल २०२३ । आजवर पोलीस स्थानकात कोणत्याही व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल होत असतो पण हि घटना वाचून तुम्ही थक्क व्हाल यात चक्क एका कुत्र्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्याने देशासह राज्यात या बातमीची चर्चा होवू लागली आहे.
काय आहे घटना !
आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वायएस जगन मोहन रेड्डी यांचे पोस्टर फाडल्याबद्दल कुत्र्याविरुद्ध पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे. घराच्या भिंतीवर लावलेलं पोस्टर कुत्र्याने फाडल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यानंतर ही तक्रार दाखल करण्यात आली आहे. विरोधी तेलुगु देसम पार्टीचा कार्यकर्ता असल्याचे सांगणाऱ्या दासरी उदयश्री यांनी उपहासाने पोलिसांत तक्रार दाखल केली. मुख्यमंत्र्यांचा अवमान केल्याप्रकरणी कुत्रा आणि त्यामागे असणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी इतर काही महिलांसोबत केली आहे.
स्थानिक माध्यमांशी बोलताना त्यांनी सांगितलं की, ज्यांच्या पक्षाने १५१ विधानसभा जागा जिंकल्या त्या जगन मोहन रेड्डी यांच्याबद्दल त्यांना खूप आदर आहे. अशा नेत्याचा अपमान करणाऱ्या कुत्र्याने राज्यातील सहा कोटी जनतेला दुखावलं आहे. आमच्या लाडक्या मुख्यमंत्र्यांचा अपमान करणाऱ्या कुत्र्याला आणि कुत्र्याच्या मागे असणाऱ्यांना अटक करण्याची आम्ही पोलिसांना विनंती केली आहे, असंही त्या म्हणाल्या. यापूर्वी जगन मोहन रेड्डी यांचा फोटो असलेले स्टिकर कुत्र्याने फाडल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. सत्ताधारी वायएसआर काँग्रेस पार्टीद्वारे सुरू असलेल्या राज्यव्यापी सर्वेक्षणाचा भाग म्हणून जगन्ना मां भविष्यथु (जगन अण्णा आमचे भविष्य) या नारा असलेले स्टिकर घरावर चिकटवले गेले. तेलुगू देसमच्या अनेक समर्थकांनी त्यांच्या सोशल अकाउंटवरून व्हिडिओ अपलोड केला आहे.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम