
काय सांगता ! उद्धव ठाकरेंनी बदलवला व्हॉट्सअप डीपी
दै. बातमीदार । ११ ऑक्टोबर २०२२ । केंद्रीय निवडणूक आयोगाने १० रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या गटांना ‘शिवसेना’ नाव तसेच ‘धनुष्यबाण’ हे निवडणूक चिन्ह वापरता येणार नाही असं जाहीर केलं आहे. त्यानंतर राज्यात ठाकरे गटाने मिळालेल्या चिन्हाचा वापर करीत जल्लोष केला तर मध्यरात्री उशिरा उद्धव ठाकरे यांच्या व्हॉट्सअप डीपीही बदलविण्यात आला आहे.
अंधेरी पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय जाहीर केल्यानंतर दोनच दिवसांनंतर आयोगाने. उद्धव ठाकरे गटाला ‘शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)’ हे नाव मिळाले आहे. तर शिंदे गटाच्या ‘बाळासाहेबांची शिवसेना’ या पर्यायी नावाला मान्यता दिली आहे. त्याचप्रमाणे ठाकरे गटाला निवडणूक चिन्ह म्हणून धगधगती मशाल देण्यात आली आहे. या निर्णयाचं ठाकरे गटाने स्वागत केलं असून सोशल मीडियावर आणि प्रत्यक्षात या मशाल चिन्हचा प्रचारही सुरु केला आहे. विशेष म्हणजे निवडणूक आयोगाच्या या निर्णयानंतर उद्धव ठाकरेंनीही आपला व्हॉट्सअप डीपीही बदलला आहे.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम