राऊत यांच्या सुनावनी दरम्यान काय झाले? वाचा सविस्तर 

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । ९ नोव्हेबर २०२२  आज शिवसेनेच्या ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांना जामीन मिळाला आहे, यानंतर राज्यात ठाकरे गटाच्या नेत्यासह कार्यकर्त्यांनी जल्लोषात या निर्णयाचे स्वागत केले असून जल्लोष देखील व्यक्त केला आहे. कारागृहात 101 दिवस वास्तव्यानंतर आज पीएएलए कोर्टात संजय राऊतांच्या जामीनावर सुनावणी सुरू होती. अचानक टाळ्यांचा कडकडाट झाला तेव्हा राऊतांना नेमके काय झाले हे कळलेच नाही, गोंधळलेली अवस्था असतानाच वकील म्हणाले, तुम्हाला जामीन मिळाला अन्..संजय राऊतांच्या डोळ्यातून आनंदआश्रू तरळले. आता मी पुन्हा लढेल, न्यायदेवतेचे आभार अशी त्यांची प्रतिक्रीया होती.

शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांना आज दुपारी जामीन मंजूर झाला. राऊतांना जामीन मंजूर होताच कोर्टरुमच्या बाहेरही टाळ्यांचा कडकडाट झाला. राऊतांच्या जामीन अर्जावर आज मुंबई सत्र न्यायालयाच्या विशेष पीएमएल कोर्टाने निकाल दिला. सर्वजण काय निकाल येईल याची वाट पाहात होते. खुद्द संजय राऊत हेही याच गोष्टीची वाट पाहत होते पण राऊतांना जामीन मंजूर होताच कोर्टरुमबाहेर टाळ्यांचा कडकडाट झाला. राऊतांना त्यावेळी नेमके काय झाले हे उमगले नाही. काही क्षणातच त्यांच्या वकिलांनी राऊत यांना जामीन मंजूर झाल्याचे सांगितले. त्यानंतर संजय राऊतांच्या डोळ्यातून अश्रू तराळले.

संजय राऊत यांना जामीन मंजूर झाल्याचे समजताच त्यांची प्रतिक्रीया फार महत्वाची होती. ते म्हणाले, आता मी पुन्हा लढेन, न्यायदेवतेचे आभार, न्यायदेवतेवर माझा पूर्ण विश्वास होता. ​

संजय राऊतांच्या जामीनावरील सुनावणीवेळी त्यांचे कुटुंबीय न्यायालयात उपस्थित होते. त्यांना जामीन मिळाल्याचे समजताच कुटुंबीय अत्यंत भावूक झाले होते. 102 दिवस दुरावलेले संजय राऊत घरी येणार हा मोठा दिलासा कुटुंबाला मिळाला. हा प्रसंग अत्यंत धीरगंभीर पण आनंदाचा होता. राऊतांच्या कुटुंबियांच्याही डोळ्यांच्या कडाही पानावल्या. संजय राऊतांना जामीन मंजूर झाल्याची बातमी मिळताच त्यांच्या आई ते येण्याची वाट पाहत आहेत. घरासमोर आता लगबग सुरू असून राऊत यांच्या स्वागताची जय्यत तयारी सुरू आहे. डीजेसह स्वागतासाठीच्या सर्व वस्तूही आणल्या असून त्यांच्या आई अगदी घराच्या वरच्या मजल्यावरील दारात उभे राहून त्या ही सर्व तयारी पाहतानाचे व्हिडीओही समोर आले आहेत.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम