नेहमी शाम्पूपेक्षा ड्राय शाम्पू काय आहे ? तुमचा होवू शकतो फायदा

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । २८ ऑक्टोबर २०२२ । महिलासाठी नेहमी केसांच्या सुरक्षिततेसाठी नेहमी सक्रीय असतात. तसेच अस्वच्छता अनेक आजारांना निमंत्रण देते. त्यामुळे शरिरासाठी स्वच्छता अतिशय महत्त्वाची आहे. यामध्ये केसांच्या स्वच्छतेलाही महत्त्व आहे. त्यासाठी अनेकजण वेळोवेळी शॅम्पूचा वापर करतात.

केसांच्या स्वच्छतेसाठी बाजारात अनेक प्रकारचे शॅम्पू उपलब्ध आहेत. अनेकांना वेळेआभावी नियमित केस धुणे शक्य होत नाही. त्यामुळे केसांचे आरोग्य बिघडू शकते. आज आम्ही तुम्हाला ड्राय शॅम्पूबद्दल सांगणार आहोत. आता तुमच्या मनात प्रश्न आला असेल की, हा ड्राय शॅम्पू म्हणजे काय? चला तर मग जाणून घेऊया सामान्य शॅम्पू आणि ड्राय शॅम्पूत नेमका फरक काय आहे. तसेच हा कसा वापरला जातो. केस रोज धुणे, ब्लो-ड्रायिंग आणि स्टाइलिंगसाठी खूप वेळ लागतो. हा वेळ कमी करण्यासाठी तुम्ही ड्राय शॅम्पूचा वापर करू शकता. तुम्हाला वेळे अभावी केसं धुणे जमत नसेल तर, तुमच्यासाठी ड्राय शॅम्पू उत्तम पर्याय आहे.

ड्राय शॅम्पू म्हणजे काय? सामान्य शॅम्पूपेक्षा कसा आहे वेगळा?
ड्राय शॅम्पू हे असे उत्पादन आहे ज्याचा वापर तुम्ही पाण्याशिवाय करू शकता. याच्या वापरामुळे केसांमधील तेलकटपणा दूर होण्यास मदत होते. ड्राय शॅम्पूला हायब्रीड शाम्पू असेही म्हणतात. ड्राय शॅम्पू पावडर स्वरूपात उपलब्ध आहे.
बहुतेकदा याची निर्मिती कॉर्न स्टार्च किंवा तांदूळ स्टार्चपासून केली जाते. ड्राय शॅम्पू आणि टाईम शॅम्पूमध्ये छोटासा फरक आहे. तो म्हणजे ड्राय शॅम्पू पावडर स्वरूपात असतो आणि रेग्युलर शॅम्पू द्रव स्वरूपात असतो.

कसा काम करतो ड्राय शॅम्पू
केस रोज धुणे, ब्लो-ड्रायिंग आणि स्टाइलिंगसाठी खूप वेळ लागतो. इथेच ड्राय शॅम्पूची गरज भासू लागते. तुम्हीही केसांना वेळ देऊ शकत नसाल तर केस स्वच्छ करण्यासाठी ड्राय शॅम्पू हा तुमच्यासाठी चांगला पर्याय आहे. कोरड्या शैम्पूमध्ये तुमच्या केसांमधून तेल आणि घाम शोषण्यासाठी अल्कोहोल- किंवा स्टार्च-आधारित सक्रिय घटक असतात. बर्‍याच ड्राय शैम्पूमध्ये सुगंध देखील असतो, ज्यामुळे तुमच्या केसांना ताजे लूक मिळू शकतो आणि तुम्हाला फ्रेश वाटू शकते. ड्राय शॅम्पूमध्ये केसांमधून तेल आणि घाम शोषण्यासाठी अल्कोहोल- किंवा स्टार्च-आधारित घटक समाविष्ट असतात. बर्‍याच ड्राय शॅम्पूमध्ये सुगंधदेखील असतो, ज्यामुळे तुमच्या केस ताजे दिसण्यास मदत होते.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम