नावात काय आहे ? खरी शिवसेना कुणाची हे सर्वांनाच माहित : संजय राऊत

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । १० ऑक्टोबर २०२२ । पत्राचाळ घोटाळाप्रकरणी अटकेत असलेल्या संजय राऊतांची आज न्यायालयीन कोठडी संपत आहे. त्यामुळे त्यांना ईडीच्या विशेष पीएमएलए कोर्टात हजर करण्यात आले. यावेळी शिवसैनिकांशी औपचारिक संवाद साधताना त्यांनी शिवसेनेचे चिन्ह गोठवल्याबद्दल आपली प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की नावात काय आहे खरी शिवसेना कुणाची हे सर्वांनाच माहित आहे.

नवीन चिन्हच शिवसेनेसाठी क्रांती घडवेल. आमच्यात शिवसेनेचे स्पिरीट आहे, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार शिवसैनिकांना संजय राऊत म्हणाले, एखाद्या पक्षाचे चिन्ह गेल्याची ही पहिलीच वेळ नाही. काँग्रेसमध्ये इंदिरा गांधीही अशाच परिस्थितीतून पुढे गेल्या होत्या. त्यांचे चिन्ह तर तीन वेळा बदलले होते. जनसंघालाही या परिस्थितीचा सामना करावा लागला. हे काही नवीन नाही. आता नवीन चिन्हच शिवसेनेसाठी क्रांती घडवेल. नावात काय आहे? खरी शिवसेना कुणाची हे सगळ्यांना माहित आहे. तसेच, आपल्यात शिवसेनेच स्पिरीट आहे, असेही शिवसैनिकांना उद्देशून राऊत म्हणाले. संजय राऊत म्हणाले, अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीत शिंदे गटालाही शिवसेनेचे नाव व पक्षचिन्ह आता वापरता येणार नाही. मात्र, या संघर्षामुळे भविष्यात आपण आणखी सक्षम होऊ.

पत्राचाळ गैरव्यवहार प्रकरणात आज संजय राऊत यांच्या जामीन अर्जावर सुनावणी होत आहे. त्यासाठी पोलिसांनी राऊतांना न्यायालयात हजर केले. पोलिस राऊतांना न्यायालयाकडे नेत असतानाच माध्यमांनीही त्यांना चिन्ह गोठवण्याविषयी प्रतिक्रिया विचारली. त्यावेळी राऊत यांनी मान हलवून त्यावर प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. पुढे तुम्ही कारागृहात जाताना महाराष्ट्र कमजोर होतोय, असे म्हणाला होता, त्याविषयी विचारले असता त्यांनी मान हलवून होकार देत आपण खरेच बोललोय, असा इशारा हाताने केला.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम