तुम्ही बिल घेतल्यावर सरकारला मिळणार पैसे !
बातमीदार | २ सप्टेंबर २०२३ | ऑगस्ट २०१३ मध्ये भारतातील वस्तू व सेवा कराचा (जीएसटी) महसूल वार्षिक आधारावर ११ टक्के वाढून १.६० लाख कोटी रुपयांवर पोहोचला. केंद्रीय महसूल सचिव संजय मल्होत्रा यांनी शुक्रवारी ही माहिती दिली. ऑगस्ट २०२२ मध्ये जीएसटीद्वारे सुमारे १.४४ लाख कोटी रुपयांचा महसूल सरकारला मिळाला होता. महसूल सचिव संजय मल्होत्रा यांनी सांगितले की, जूनच्या तिमाहीत जीडीपी वृद्धी ७.८ टक्के राहिली, तर जीएसटी महसूल ११ टक्क्यांपेक्षा अधिक वाढला. कर जीडीपी गुणोत्तर १.३३ पेक्षाही अधिक आहे.
देशातील ६ राज्ये आणि केंद्र शासित प्रदेशांत ‘माझे बिल, माझा अधिकार’ ही पथदर्शक (पायलट) पुरस्कार योजना सुरू करण्यात आली. महसूल सचिव मल्होत्रा यांनी सांगितले की, ही जीएसटी लकी ड्रॉ योजना असून केंद्र व राज्य सरकारे यात समान स्वरूपात योगदान देतील. जीएसटीमुळे नागरिक, ग्राहक आणि सरकार यांचा फायदा झाला. महसूल प्रत्येक महिन्यात वाढत आहे. जीएसटीचे कर दर कमी व्हावेत, यासाठी केंद्र आणि राज्य सरकारे एकत्र आली आहेत
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम