गौतमी बैलासमोर नाचेल आणखी कुठे ? अजित पवारांनी दिले उत्तर !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । २९ एप्रिल २०२३ ।  राज्यभरात गौतमी पाटीलला कोण ओळखत नसेल असे होवू शकत नाही, अल्पावधीत राज्यातील तरुणाईच्या गळ्यातील ताईत झालेल्या गौतमी नेहमीच आपल्या नृत्यामुळे चर्चेत येत आहे. तर तिच्यावर राजकीय क्षेत्रातून होणाऱ्या टीकेमुळे देखील ती जनतेच्या मनात स्थान निर्माण करीत आहे. गौतमी शिवाय गावचा एकही कार्यक्रम होत नाही.

गौतमी आणि गर्दी हे ठरलेलं समीकरण आहे. गौतमी जिथे जातं तिथे गर्दी होतेच होते. गौतमी तिच्या अदामुळे खूप चर्चेत असते. अशातच आता गौतमीचा एक व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल हॉट आहे. मुळशीत गौतमी चक्क बैलासमोर नाचली आहे. बावऱ्या नावाच्या बैलासमोर गौतमी लचकत, मुरडत नाचली. हा व्हिडिओ सोशल मिडियावर तुफान व्हायरल होत आहे.

गौतमीच्या या व्हिडिओबद्दल पुण्यात प्रसारमाध्यमाच्या प्रतिनिधीने विरोधी पक्षनेते अजित पवारांना प्रश्न विचारला. त्यावर ‘तुला काय वाईट वाटलं. ती बैलासमोर नाचेल नाहीतर आणखी कोणासमोर नाचेल. तुला का त्रास होतोय,’ अशी मिश्कील टिप्पणी अजित पवार यांनी केली आहे. ‘यात्रेत पाटीलबाईला बोलवायचं का रात्री?’ या वक्तव्यावरही अजित पवार म्हणाले की “अनेक गावांत यात्रा, जत्रा सुरू आहेत. तेव्हा काही ठिकाणी करमणुकीसाठी तमाशे बोलवले जातात. त्यामुळे सध्या गौतमीचं नाव गाजत असून, पाटलीबाईंना आणा, याबद्दल मी सुचवलं होतं. जर त्यांना सुपारी परवडत, असेल तर नक्की बोलवावे,” असं अजित पवार म्हणाले आहेत.
पुढे अजित पवार म्हणाले की, “बैल काय गायीसमोर नाचू देत, तिचा तो अधिकार आहे. हाच गौतमीचा व्यवसाय आणि उपजिविकेच साधन देखील आहे. कला आणि अभिनयाच्या माध्यमातून ती त्याच्याकडं पाहते. लहान मुलाचं बारसं आहे, त्याला अजून काहीच कळत नाही. तरी देखील बारशाच्या निमित्ताने बोलावलं, तर तिला नाचावच लागतं. बैलाचा वाढदिवस असो किंवा बैलपोळाच्या शर्यतीत बैलगाडा पहिला आला असेल, तिचे ते कामच आहे,” असेही अजित पवारांनी पुढं सांगितलं आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम