लोकांना वेड लावलेली सृष्टी आहे तरी कोण ?

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । १७ ऑक्टोबर २०२२ ।  सोशल मीडियावर हसल 2.0 मध्ये गाणाऱ्या गायकांची मोठी हवा आहे. मात्र यासगळ्यात सर्वाधिक चर्चा आहे ती प्रसिद्ध रॅपर तावडेची. तिनं गेल्या काही दिवसांत नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. ज्यामुळे श्वेता कमालीची चर्चेत आली आहे. एमटीव्हीचा सिगिंग रियॅलिटी शो सुरु आला आणि देशातील तरुणांचे लक्ष त्याकडे वेधले गेले आहे. त्या रियॅलिटी शो चे नाव हसल 2.0 असे आहे. जो की रॅपचा रियॅलिटी सिंगिंग शो आहे. ज्याला अवघ्या काही दिवसांत प्रचंड लोकप्रियता मिळाली आहे. आपल्याकडे गली बॉय हा रॅपवर आधारित चित्रपट काही वर्षांपूर्वी आला होता. ज्याला भारताकडून त्या वर्षीच्या ऑस्करसाठी पाठविण्यात आले होते. अर्थात त्याला काही ऑस्कर मिळाला नाही. मात्र या चित्रपटानं प्रेक्षकांची मनं जिंकून घेतली होती. हे सगळं सांगण्याचा उद्देश असा की आता हसल 2.0 ने तरुणांना वेड लावले आहे.

प्रसिद्ध रॅपर तावडेची तिचं रॅप, त्यातील शब्द, परखड भाष्य, विषयाची निवड हे सारं तरुणाईला कमालीचे आवडले आहे. यासगळ्यात तिचं मैं नही तो कौन बे….या रॅपनं तर अनेकांना वेडं केलं आहे. युट्युबवर पावणे दोन कोटी व्हयुज या व्हिडिओला मिळाले आहेत. त्यावरुन त्याची लोकप्रियता लक्षात येईल. सध्या श्वेताचं ते रॅप अनेकांच्या ओठी आहे.लोकांना वेड लावलेली सृष्टी आहे तरी कोण ?

हसल 2.0 मध्ये सर्वाधिक लोकप्रिय झालेली श्वेताचा शोध आता गुगलवर घेतला जातोय. ती कोण आहे, काय करते, याविषयी अनेकांना जाणून घ्यायचे आहे. तिचं बॅकग्राउंड काय आहे, ती रॅपर कशी झाली याची माहिती तिच्या चाहत्यांना हवी आहे. सुष्टी महाराष्ट्रात राहणारी असून हसल 2.0 मध्ये येण्यापूर्वी ती एक कंटेट रायटर म्हणून काम करत होती. मुंबईत जन्म झालेल्या सृष्टीचं वय 20 वर्षे आहे. सोशल मीडियावर ती सर्वाधिक सर्च होणारी सेलिब्रेटी झाली आहे. तिच्या चिल किंडा, भगवान बोल रहा हू, छोटा डॉन, मेरा बचपन कहा गया आणि मैं नही तो कौन बे सारख्या रॅपला मोठा प्रतिसाद मिळाला आहे. हसल मध्ये येण्यापूर्वी तिला रॅप लिहिण्याची आवड होती. या शोमध्ये गेल्यावर त्या कल्पकतेला अधिक सर्जनशीलतेचे वेध लागले होते. काही दिवसांपूर्वी तिनं नेपोटिझवर आधारित एक रॅप लिहिलं होतं. इंस्टावरही सृष्टीला फॉलो करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. तिला 5 लाख फॉलोअर्स आहेत.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम