बड्या उद्योगपतीच्या प्रेमात पडणारी ‘हि’ आहे तरी कोण ?

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । २२ नोव्हेबर २०२२ अभिनेत्री विश्वसुंदरी मानुषी छिल्लर हि देशातील बड्या उद्योगपतीच्या प्रेमात पडल्याची बातमी सध्या व्हायरल होत आहे. त्यावरुन वेगवेगळ्या प्रतिक्रियांना उधाण आले आहे. ती सध्या भलतीच चर्चेत आली आहे. त्याला कारणही तसचं आहे. तिच्या प्रेमप्रकरणाची चाहुल आता नेटकऱ्यांना लागली आहे.

बॉलीवूडचा खिलाडी अक्षय कुमारच्या पृथ्वीराजमध्ये मानुषीनं प्रमुख अभिनेत्री म्हणून काम केलं होतं. तिची ती भूमिका चाहत्यांना आवडलीही होती. मात्र प्रेक्षकांना सम्राट पृथ्वीराज काही भावला नाही. त्यामुळे बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाला मोठा धक्का बसला. तीनशे कोटींपेक्षा अधिक बजेट असणाऱ्या पृथ्वीराजच्या अपयशानं अक्षयही नाराज झाला होता. यासगळ्यात मानुषी मात्र भाव खावून गेली होती.

मानुषी सोशल मीडियावर तिच्या फोटो आणि व्हिडिओमुळे नेहमीच नेटकऱ्यांच्या चर्चेचा विषय असल्याचे दिसून आले आहे. यापूर्वीच्या तिच्या पोस्टला नेटकऱ्यांचा मोठा प्रतिसाद मिळाला आहे. खासकरुन मानुषीचे फोटो हा तर त्यांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. सध्या मानुषी एका वेगळयाच कारणासाठी चर्चेत आली आहे. ते कारण रोमँटिक आहे. मानुषी प्रेमात पडली आहे. देशातील एका प्रसिद्ध उद्योगपतीच्या प्रेमात पडलेल्या मानुषीच्या व्हायरल झालेल्या त्या बातमीनं नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम