शाहरुख नेहमी सोबत दिसणार हि महिला आहे तरी कोण ?

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । ८ मे २०२३ ।  स्टार अभिनेता म्हणून नेहमीच शाहरुख खानचे नाव पुढे येते पण नेहमी शाहरुखच्या आजूबाजूला एक महिला असते. अनेकांना माहित नसेल हि महिला नेमकी कोण आहे ? शाहरुखची तीच माहिती आज आम्ही तुम्हाला देणार आहोत. हि महिला आहे. पूजा ददलानी, जी शाहरुखची मॅनेजर आहे. पूजा ददलानी नेहमीच काहीना काही कारणांमुळे चर्चेत असते.

गेल्या 11 वर्षांपासून पूजा ददलानी शाहरुख खानसोबत काम करत आहे. ती 2012 पाहून शाहरुख सोबत काम करतीये, तेव्हापासून ती सतत त्याच्याशी जोडलेली आहे. विशेष सांगायचं झालं तर या वर्षांत पूजाने केवळ प्रसिद्धीच नाही तर भरपूर संपत्तीही कमावली आहे. आज ती करोडोंच्या मालमत्तेची मालकीण आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पूजा ददलानीचा एक वर्षाचा पगार 7 ते 9 कोटी इतका आहे. त्यामुळे ती अतिशय विलासी जीवन जगते. तसंच, जर तिच्या एकूण संपत्तीबद्दल बोलायचं झालं तर, 2021 च्या अहवालानुसार, ती 45 ते 50 कोटींच्या मालमत्तेची मालकीण आहे.

गौरी खानने केलंय तिचं नवीन घर डिझाइन
2023 च्या सुरुवातीला पूजानं एका नवीन घर घेतलं , ज्याची डिझाइन शाहरुख खानची पत्नी गौरी खानने केली होती. पूजाने गौरीसोबतचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर करताना याबाबतची माहिती दिली होती. पूजा ददलानीच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचं झालं तर, 2018 मध्ये तिनं हितेश गुरानी नावाच्या व्यक्तीशी लग्न केलं होतं. हितेन हा एक बिझनेसमन आहे. तसंच या दोघांनाही एक मुलगी आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम