शाहीद व करीनाचे का झाले होते ब्रेकअप !
बातमीदार | १० ऑगस्ट २०२३ | बाॅलिवूड क्षेत्रामध्ये कोणता अभिनेता कोणत्या अभिनेत्रीला डेट करेल हे काही महिन्यानंतर बाहेर येत असते तसेच एका लव्हस्टोरीची मोठी देशभर चर्चा सुरु झाली होती. ती म्हणजे करीना कपूर आणि शाहिद कपूर यांची लव्ह स्टोरी. हे कपल एकमेकांना तब्बल ५ वर्ष डेट केली होती. देशभरातील त्यांचे असंख्य चाहते देखील त्यांच्या लग्नाची आतुरतेने वाट बघत होते. पण त्यांचे लग्न होवू शकले नव्हते. सर्वकाही व्यवस्थित सुरू असताना अचानक यांचे ब्रेकअप झाल्याने सर्वांनाच मोठा धक्का बसला.
विशेष म्हणजे करीना कपूर हिने शाहिद कपूर याच्यासाठी आपल्या आयुष्यामध्ये मोठे बदल केले होते. धक्कादायक गोष्ट म्हणजे करीना कपूर आणि शाहिद कपूर यांचे ब्रेकअप हे जब वी मेट चित्रपटाच्या शूटिंग वेळीच झाले. पाच वर्षे एकमेकांना डेट करत असताना चित्रपटाच्या शूटिंग वेळीच यांचे ब्रेकअप झाले. विशेष म्हणजे ब्रेकअप झाल्यानंतरही करीना कपूर आणि शाहिद कपूर यांनी चित्रपटामध्ये धमाकेदार भूमिका केली. करीना कपूर हिचे शाहिद कपूर याला डेट करणे तिच्या आईला अजिबातच आवडले नव्हते. करीना कपूर हिची आई बबीता हिला शाहिद कपूर हा अजिबातच आवडत नव्हता.
इतकेच नाही तर करीना कपूर हिने शाहिद कपूर याच्यासाठी आपल्या आयुष्यामध्ये अनेक बदल केले होते. जे तिच्या आईला मुळीच आवडले नव्हते. शाहिद कपूर याची देवावर खूप जास्त श्रध्दा आहे. उपवास आणि पूजा शाहिद कपूर हा नेहमीच करतो. इतकेच नाही तर शाहिद कपूर हा वेजेटेरियन आहे. प्रेमामध्ये शाहिद कपूर याच्यासाठी करीना कपूर हिने नॉनव्हेज खाणे देखील बंद केले होते. जे करीना कपूर हिच्या आईला आवडले नव्हते. याचा खुलासा करीना कपूर हिनेच केला. करीना कपूर हिच्या आईला आईला शाहिद कपूर न आवडण्याचे प्रमुख कारण म्हणजे त्यावेळी शाहिद कपूर हा खूप जास्त प्रसिद्ध अभिनेता नव्हता. दुसरीकडे करीना कपूर ही बाॅलिवूडच्या टाॅप अभिनेत्रींमध्ये होती. यामुळेच करीना कपूर हिच्या आईला शाहिद कपूर हा आवडत नव्हता. करीना कपूर आणि शाहिद कपूर यांची जोडी प्रेक्षकांना प्रचंड चर्चेत होती. शाहिद कपूर याच्यासोबत ब्रेकअप झाल्यानंतर करीना कपूर हिने सैफ अली खान याला डेट करण्यास सुरूवात केली.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम