
कावळा का देतो असे संकेत ; जाणून घ्या सविस्तर !
दै. बातमीदार । २७ जुलै २०२३ । प्रत्येक धर्मात वेगवेगळ्या पौराणिक कथा असतात काही खऱ्या असतात तर काही बनविलेल्या असतात असेच हिंदू धर्माशी संबंधित पौराणिक ग्रंथांमध्ये शकुन आणि अप शकुन याविषयी सविस्तर माहिती देणयात आली आहे. आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या अनेक घटना आपल्याला भविष्यात घडणाऱ्या शुभ-अशुभ घटनांचे संकेत देत असतात, अशी धार्मिक धारणा आहे. शकुन शास्त्रामध्ये कावळ्याबाबत अनेक प्रकारच्या गोष्टी सांगितल्या आहेत. पौराणिक ग्रंथांमध्ये कावळा हा मृत्यूची देवता यमराजाचा दूत मानला जातो. सामान्यतः असे मानले जाते की कावळा बहुतेक अशुभ घटनांचे संकेत देतो, परंतु तसे नाही. काहीवेळा कावळा शुभ संकेतही घेऊन येतो.
कावळा एखाद्या व्यक्तीच्या डोक्यावर बसल्यास
कावळा डोक्यावर बसने हा अशुभ संकेत मानला जातो. असे मानले जाते की जर कावळा येऊन एखाद्या व्यक्तीच्या डोक्यावर बसला तर घरात आर्थिक अडचण निर्माण होणार आहे किंवा त्याच्या मान-सन्मानात घट होणार आहे याचा हा संकेत आहे.
छतावर बसलेले कावळे
जर कावळा येऊन घराच्या छतावर बसला आणि काव काव करू लागला तर ते शुभ लक्षण मानले जाते. हे घरी पाहुण्यांचे आगमन सूचित करते. घरात पाहुणे येणे शुभ मानले जाते. यामुळे घरात सुख-समृद्धी येते.
पोळीचा तुकडा घेऊन उडणे
जर कावळा चोचीत पोळीचा तुकडा घेऊन उडताना दिसला तर ते देखील शुभ लक्षण मानले जाते. याचा अर्थ तुमच्या काही मोठ्या इच्छा लवकरच पूर्ण होणार आहेत. काही चांगली बातमीही मिळू शकते. अनेक कावळे एकत्र काव काव करत असतील तर घराजवळ किंवा छतावर कळपात कावळे एकत्र ओरडत असतील तर ते अशुभ लक्षण मानले जाते. कुटुंबातील एखाद्या सदस्यावर मोठा धोका संभवतो.
दक्षिणेकडे तोंड करून कावळा ओरडत असेल तर
जर कावळा दक्षिणेकडे तोंड करून ओरडत असेल तर ते अशुभ मानले जाते. हे कुटुंबातील एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूचे संकेत देते. हे कुटुंबातील सदस्याच्या गंभीर आजाराचे किंवा अपघाताचे लक्षणही मानले जाते.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम