भारताला धक्का : हा खेळाडू पहिल्या वनडेत खेळणार नाही !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । २७ जुलै २०२३ ।  देशात सध्या वनडे सामना खेळला जात असून यात भारतीय संघ आज वेस्ट इंडिजविरुद्ध खेळत आहे मात्र आता वनडे सामन्याच्या काही तास आधी भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे. संघाचा स्टार वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज अचानक भारतात परतला आहे आणि तो या एकदिवसीय मालिकेत भाग खेळणार नाही. याचे कारण समोर आले आहे.

मीडिया रिपोर्टनुसार, रविचंद्रन अश्विन, अजिंक्य रहाणे, केएस भरत आणि नवदीप सैनी दुसऱ्या कसोटीनंतर भारतात परतले आहेत, कारण हे खेळाडू एकदिवसीय मालिकेत सहभागी नव्हते. या खेळाडूंसोबत मोहम्मद सिराजही भारतात आला आहे. बीसीसीआयने त्याचा वर्कलोड लक्षात घेऊन एकदिवसीय मालिकेतून विश्रांती दिली आहे. मात्र अद्याप बीसीसीआयने त्याच्या कोणतीही माहिती दिलेली नाही. तसेच बदलीची घोषणाही केली नाही.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम