रात्री नखे किवा केस कापणे का आहे चुकीचे? जाणून घ्या सविस्तर

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । १६ नोव्हेबर २०२२ हिंदू धर्मात विविध प्रथा आणि परंपरा आजही लोक जोपासत असतात. या प्रथा वर्षानुवर्षे सुरू आहेत. यामध्ये अशा अनेक गोष्टी आहेत, ज्यांचा उल्लेख शास्त्रात आहे. ज्यांना या प्रथा माहीत आहेत. त्यांना त्यामागील कारण माहित नाही, परंतु तरीही या नियमांचे पालन करतात. नखे आणि केस कापणे, झाडू मारणे आणि इतर अनेक गोष्टी रात्रीच्या वेळी केल्यास जुने लोकं अजूनही टोकतात. यामागे प्रत्येकजण वेगवेगळी कारणे सांगतात. ग्रामीण भागात वडीलधाऱ्यांच्या या सल्ल्याचे पालन करणारे अनेक जण आहेत. या मागचे कारण जाणून घेऊया

वैज्ञानिक कारण
शास्त्रीय दृष्टीकोनातून पाहिले तर रात्री केस न कापण्याचे कारण म्हणजे रात्री केस इकडे तिकडे उडतात. काही वेळा अन्नात केस जाण्याची शक्यता असते. त्यामुळे आजारी पडण्याची भीती आहे. याशिवाय केसांतून घाण आणि बॅक्टेरिया पसरण्याची भीती असते. त्यामुळे रात्री केस कापण्यास मनाई केली जाते.

धार्मिक कारणे
हिंदू धर्मात सूर्योदय आणि सूर्यास्ताला खूप महत्त्व दिले जाते. दिवसाची वेळ कोणत्याही कामासाठी अनुकूल मानली जाते. सूर्यास्तानंतर केस किंवा नखे ​​कापू नयेत हा जुना नियम आहे. ज्यावर आजही लोक विश्वास ठेवतात. वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार रात्री केस कापणे अशुभ मानले जाते. असे मानले जाते की संध्याकाळी लक्ष्मी घरात वास करते. सुख-समृद्धी आणि ऐश्वर्य मिळावे यासाठी महालक्ष्मी रात्री घरी राहते. त्यामुळे रात्री केस न कापण्याचा सल्ला दिला जातो. दुसऱ्या दृष्टिकोनातून पाहिल्यास पूर्वीच्या काळी वीज नसल्याने केसं कापताना इजा होण्याची शक्यता होती. यामुळेदेखील रात्री केसं कापण्यास मनाई केली जात असे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम