अंडीमधील पिवळा भाग का आहे महत्वाचा !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । २४ मे २०२३ ।  हिवाळा असो वा उन्हाळा अनेकांना आहारात अंडी खायला खूप आवडत असते. खरं तर, अंडी शरीरासाठी खूप फायदेशीर असतात. तसेच त्यात अनेक प्रकारचे पौष्टिक घटक आढळतात. तसेच अंडी हा उच्च दर्जाच्या प्रथिनांचा चांगला स्रोत आहे. आपल्या स्नायूंच्या आरोग्यासाठीही अंडी अतिशय उपयुक्त ठरतात. याशिवाय, अंडी तुमच्या रक्तातील साखर नियंत्रित करण्यासाठी, प्रतिकारशक्ती मजबूत करण्यासाठी आणि वजन कमी करण्यासाठी खूप प्रभावी मानली जाते. मात्र काही जण अंड्याचा पांढरा भाग किंवा अंड्याचा पिवळा भाग यामधील एकच भाग काहीतरी खातात. पण असे का खातात? याचा विचार तुम्ही कधी केलात का?

अंड्यांमध्ये व्हिटॅमिन डी मुबलक प्रमाणात आढळते. जे हाडे मजबूत करण्यासाठी फायदेशीर आहे. अंडी हा सर्वोत्तम आणि आरोग्यदायी पदार्थांपैकी एक मानला जातो. बऱ्याचदा व्यायामानंतर उकडलेले अंडे खातात तर पिवळा भाग काढून टाकण्याचा सल्ला दिला जातो. कारण त्यामागे वजन आणि चरबी वाढेल अशी कारण सांगितली जातात. याउलट, पिवळ्या भागात अनेक गोष्टी सामायिक आहेत. पिवळ्या भागामध्ये पांढऱ्या भागापेक्षा जास्त कॅल्शियम आणि प्रथिने असतात. अंड्याचा पिवळा भाग खाण्याचे अनेक फायदे आहेत.

अंड्यातील पिवळ बलकमध्ये कॅरोटीनोइड्स, ल्युटीन आणि झेक्सॅन्थिन असतात. हे अँटिऑक्सिडंट स्नायू तयार करण्यास आणि शरीरात बायोटिनसारखे संयुगे वाढवण्यास मदत करतात. याशिवाय जे लोक बारीक आहेत त्यांच्यासाठी अंड्याचे पिवळे बलक खाणे जास्त फायदेशीर आहे. तसेच केसांच्या वाढीस प्रोत्साहन देते. त्याचबरोबर शरीरातील प्रथिनांच्या कमतरतेमुळे उद्भवणारी लक्षणे दूर करण्यास मदत करते. अंड्यातील पांढरा भाग हृदय विकाराने त्रस्त असलेल्या रुग्णांसाठी फायदेशीर आहे. हे उच्च उष्मांक असलेले पदार्थ आहेत जे शरीराला प्रथिने देतात परंतु कोलेस्ट्रॉल वाढवत नाहीत. याशिवाय त्यात अनेक प्रकारचे अमिनो अॅसिड असतात, जे स्नायूंच्या विकारांना प्रोत्साहन देतात आणि स्नायूंच्या वाढीसाठी योग्य असतात.

अंड्यातील पिवळ बलक किंवा अंड्याचा पांढरा भाग या दोन्ही वेगवेगळ्या परिस्थितीत फायदेशीर ठरू शकतात. म्हणजेच, अंड्यातील पिवळ बलक बारीक लोकं आणि पूर्णपणे निरोगी लोक खाऊ शकतात. तसेच ज्यांना वजन कमी करायचे आहे त्यांच्यासाठी अंड्यातील पांढरा भाग जास्त फायदेशीर आहे. जर तुम्ही पूर्णपणे निरोगी असाल आणि लठ्ठपणा आणि उच्च कोलेस्ट्रॉल टाळत असाल तर अंड्याचा पांढरा भाग खा.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम