
अभिनेत्री पडणार पुन्हा एकदा प्रेमात !
दै. बातमीदार । २४ मे २०२३ । देशात मोठ्या उत्साहात झालेल्या बिग बॉस 13’ मधून लोकप्रियता मिळवणारी सर्वांची आवडती शहनाज गिल पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. यावेळी ‘देसी वाइब्स विथ शहनाज गिल’ या शोमध्ये ‘प्रेम’ आणि ‘धोका’चा यावर तिने तिचे मत मांडले आहे. नवाजुद्दीन सिद्दीकी तिच्या शोमध्ये पाहुणा म्हणून आला होता, ज्याने सनाला विचारले की तिला मनापासून काय करायचे आहे.
जेव्हा जेव्हा शहनाजचे नाव येते तेव्हा सिद्धार्थ शुक्लाची आठवण नक्कीच होते.असे म्हटले जाते की दोघेही एकमेकांवर खूप प्रेम करत होते, पण त्यांनी त्यांच्या नात्याला ‘मैत्री’ असे नाव दिले. ‘शहनाज गिल टॉक शो’च्या नुकत्याच झालेल्या एपिसोडमध्ये शहनाज नवाजुद्दीन सिद्दीकीसोबत दिसली होती.यावेळी त्यांनी प्रेम, करिअरसह अनेक गोष्टींबद्दल बोलले.जेव्हा नवाजुद्दीनने शहनाजला विचारले की,’अभिनय, गाणे आणि शो होस्ट करण्याव्यतिरिक्त तिला ”एक गोष्ट मनापासून कुठली करायची आहे?’या प्रश्नाला उत्तर देताना सनाने थांबून ‘प्रेम’ असे उत्तर दिले.
तेव्हा शहनाज गिलने पुढे सांगितले की, ‘जर प्रेम झाले, तर प्रेमात धोका मिळणार, जर प्रेमात धोका मिळणार तर आणि असे झाले तर माझी एक्टिंग बाहेर येईल.’यानंतर तो सुद्धा म्हणाला, ‘माझी फसवणूक अशीच होणार, तू रडत राहशील, तू अभिनयही करणार नाहीस, चोवीस तास माझा विचार करशील, मी असा वेडा माणूस आहे… प्रत्येकाची प्रेम करण्याची पद्धत असते. मी थोडी वेगळी आहे. काही दिवसांपूर्वी, ‘किसी का भाई किसी की जान’च्या प्रमोशनदरम्यान, सलमान खानने त्याला ‘मूव्ह ऑन’ करण्याचा सल्ला दिला होता

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम