रानडुकरांचा उपद्रव वाढला; तांदुळवाडी च्या शेतकऱ्यांची फाडली मांडी

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार | ३ एप्रिल २०२४ । कजगाव ता.भडगाव येथुन जवळच असलेल्या तांदुळवाडी ता.भडगाव येथील शेतकरी शेतात पिकास पाणी भरत असतांना त्यांच्यावर रानडुक्कर ने हल्ला केल्याने ते गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी चाळीसगाव च्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

कजगाव सह परिसरात रानडुकरांचा उपद्रव मोठ्या प्रमाणात वाढला असल्याने शेतकरी हतबल झाला आहे. दि.३ रोजी तांदुळवाडी ता.भडगाव येथील शेतकरी रविंद्र सुपडु पाटील वय ५० हे सकाळी बाजरी, मका पिकांना पाणी भरण्यासाठी भोरटेक शिवारातील आपल्या शेतात गेले होते. पिकांना पाणी भरत असतांना अचानक रानडुक्कर ने पाटील यांचेवर झडप घेत मांडीला चावा घेत मांडी फाडल्याने त्यांना तात्काळ चाळीसगाव च्या खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. अगोदर पिकांची नासाडी करणाऱ्या रानडुक्कर ने शेतकऱ्यावर हल्ले चढवण्यास सुरुवात केल्याने शेतकरी सह मजुर वर्गात धोक्याचे वातावरण पसरले आहे.

कजगाव परीसरात देखील रानडुक्कर ने कहर केला असल्याने शेतकरी हतबल झाले आहे. तोंडी आलेला घास वाचविण्यासाठी शेतकरी रात्र दिवस पिकांच रक्षण करण्यासाठी विविध उक्त्या अवलंबत आहे. यात मोठ्या आवाजाचे फटाके फोडणे, डफ वाजवणे, स्पीकर द्वारे कुत्र्याचा आवाज, ठासनी ने फटाक्यांचा आवाज हा सारा सोपस्कार करून देखील रानडुक्कर दिशा बदलवत पिकांची नासाडी करत असल्याने शेतकरी जेरीस आला आहे.

रानडुक्करांचा उपद्रव दिवसेंदिवस वाढत चाललेला आहे शेत शिवारात अक्षरक्ष उच्छाद मांडला आहे. येथील टाकळी रस्त्यावरील शेतशिवारात अनेक शेतकऱ्यांचा मका फस्त केल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. आधीच शेतकरी पावसाळा कमी मुळे जेमतेम पाण्यावर रात्र दिवस एक करत पिकं वाचवण्यासाठी मेहनत घेत आहे. त्यात अनेक अडचणीचा सामना करत असतांना आता डुकरांच्या उपद्रवामुळे हैराण झाला आहे. रानडुक्करांचा त्वरित बंदोबस्त करण्यात यावा अशी मागणी केली जात आहे. रानडुकराची दहशत कजगाव परिसरातील शिवारात रानडुक्करांची संख्या वाढली आहे मका सह अन्य पिकांचा आहार मजबुत मिळत असल्याने हे रानडुक्कर मजबुत बनले आहेत.

त्याचं अवसान पाहुन शेतकरी देखील घाबरत आहे. या प्रमाणे या शिवारात या रानडुक्करांची दहशत वाढली असुन दि.३ रोजी शेतकऱ्यावर रानडुक्कर ने हल्ला केल्याने गावातील शेतकऱ्यांमध्ये धोक्याचे वातावरण पसरले आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम