समृद्धी महामार्गावरील वाहतूक थांबवावी ; हायकोर्टात याचिका !

बातमी शेअर करा...

बातमीदार | २४ ऑगस्ट २०२३

राज्यातील मोठ्या शहरांतील अंतरकमी कालावधीत पोहचण्यासाठी समृद्धी महामार्ग सुरु करण्यात आला असून यावर अपघाताची मालिका नियमित मोठ्या प्रमाणात सुरु असल्याने त्यावरील वाहतूक तूर्तास थांबवावी, अशी मागणी करणारी याचिका मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपिठात दाखल करण्यात आली आहे. समृद्धी महामार्ग सुरु झाल्यापासून अपघातामुळे जास्त चर्चेत आला आहे. या मार्गावर अपघातांची मालिका सुरुच असते.

समृद्धीवर सुरक्षिततेच्या उपाययोजना कराव्या तोपर्यंत महामार्गावरील वाहतूक थांबवावी, अशी मागणी करणारी याचिका न्यायालयात दाखल करण्यात आली आहे.

याचिकेत काय म्हटलं?
समृद्धी महामार्गाचे लोकार्पण झाले तेव्हापासूनच समृद्धीवर अपघात होत आहेत. सुरक्षेच्या उपाययोजना कराव्या. समृद्धी महामार्गावर सुरक्षेच्या कुठल्याही उपाययोजना नाहीत. या याचिकेवर ४ आठवड्यांत उत्तर देण्याचे खंडपीठाने सरकारला आदेश दिले आहेत.
तज्ञांचे पॅनल तयार करावे, चिन्ह लावावी, प्राथमिक उपचार केंद्र सुरु करावी, न्यायालयाने राज्य सरकार आणि एमएसआरडीसीला नोटीस बजावली आहे. तसेच ४ आठवड्याच उत्तर मागितले आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम