कुणासमोर झुकणार नाही ; माजी आ.हर्षवर्धन जाधव !
दै. बातमीदार । २४ जुलै २०२३ । राज्यात आपल्या वक्तव्यातून व आपल्या आंदोलनातून नेहमी चर्चेत असलेले माजी आ.हर्षवर्धन जाधव फार फडफड करतोय, खरे बोलतोय, रोखठोक बोलतोय म्हणून मी सरकारच्या डोळ्यात खूपतोय. 2011 प्रकरणात मला मिळालेली बेल रद्द करावी म्हणून 2022ये सरकार अर्ज करते. यावरून स्पष्ट होते की ते माझ्या मागे लागलेले आहेत, मला अडकवण्यासाठी काहीही करतील. पण मी मागे हटणार नाही, कुणासमोर झुकणार नाही, प्रामाणिकपणे काम करतच राहणार, असा निर्धार माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी व्यक्त केला.
मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने हर्षवर्धन जाधव यांच्याविरोधात राज्य सरकारने केलेले अपील फेटाळल्यानंतर जाधव अधिक आक्रमक झाल्याचे पहायला मिळाले. मी देवाचे काम करतो आहे, लोकांसाठी काम करतोय. कुणाला घाबरत नाही, स्पष्ट बोलतो हे अनेकांना आवडललेले नाही. म्हणून मला कुठे तरी अडकवण्याचा, रोखण्याचा प्रयत्न राज्य सरकारने माझा जामीन रद्द करावा, या अर्जाच्या माध्यमातून केला.
पण कोर्टाने तो फेटाळून लावला. माझ्यावर आरोप आहेत, गुन्हे सिद्ध झालेले नाहीत. जाधव हे राजकारणी आहेत, त्यांना विरोधक देखील आहेत हे देखील कोर्टाने स्पष्ट सांगितले. तरी देखील मला अडकवण्यासाठी सरकार आणि माझे विरोधक काहीना काही निश्चित करतील. पण मी कुणालाही घाबरणार नाही, लोकांसाठी काम करतच राहणार. सगळेच राजकारणी स्वार्थी झाले तर आज सत्तेसाठी पाठीत खंजीर खुपसतायेत, उद्या पोटात खुपसतील. मला अशा राजकारणात रस नाही, मी परोपरकाराचे काम करतो, लोकांसाठी काम करतो. मला संपत्ती कमावयची नाही, की पेट्रोलपंप टाकायचे नाहीत. त्यामुळे उद्या हर्षवर्धन जाधवचे काही बरे वाईट झाले, तरी परोपकार सोडू नका, असे आवाहनही त्यांनी केले.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम