शरद पवार स्वत: लोकसभा निवडणूक लढतील?; राजकीय वर्तुळात चर्चा सुरु!

advt office
बातमी शेअर करा...

दै. बातमीदार | ७ एप्रिल २०२४ | सध्या सर्वत्र लोकसभा निवडणुकांची तयारी जल्लोषात सुरु आहे. काही ठिकाणी उमेदवारांच्या नावांची घोषणा झाली आहे तर काही ठिकाणी अजूनही उमेदवारांच्या नावांची घोषणा बाकीच आहे. महावीकास आणि महायुती या दोन्ही आघाड्यांमध्ये काही ठिकाणी उमेदवारीचा पेच कायम असल्याचे चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे. महाविकास आघाडी आणि महायुतीचं आतापर्यंत जागावाटप देखील पूर्ण झाले नसून उमेदवारांच्या याद्याही जाहीर होणे बाकी आहे.

 

माढा मतदारसंघातील उमेदवाराची घोषणा १२ एप्रिलला होण्याची शक्यता आहे. तसेच उमेदवारयामध्ये मोहिते पाटील किंवा निंबाळकरांच्या घरातील असल्याच्या चर्चा सध्या सुरू आहेत. त्याचबरोबर महत्वाची गोष्ट म्हणजे माढा लोकसभा मतदारसंघातून स्वत: शरद पवार लोकसभा निवडणूक लढतील, अशी देखील राजकीय वर्तुळात चर्चा सुरु आहे.

 

शरद पवार यांनी माढा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवावी अशी राष्ट्रवादीच्या नेत्यांची, कार्यकर्त्यांचीही तशी भावना आहे.

 

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम