‘हा’ अभिनेता सोडणार चित्रपटसृष्टी ? चर्चेला उधान !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । १३ जुलै २०२३ ।  देशातील चित्रपटाच्या जगतात दाक्षिणात्य अभिनेता थलापति विजय हा नेहमीच लोकप्रिय कलाकारांपैकी एक आहे. विजय हा सगळ्यात जास्त मानधन घेणाऱ्या अभिनेत्यांपैकी एक आहे. दरम्यान, आता माहिती समोर येत आहे की विजय आता त्याच्या फिल्मी करिअरला पूर्णविराम देत राजकीय करिअरला सुरुवात करणार असल्याचे म्हटले जाते. रिपोर्ट्सनुसार, थलापति विजय ‘लियो’ या त्याच्या आगामी चित्रपटाच्या प्रमोशनआधी तमिलनाडूत पदयात्रा करणार असल्याचे म्हटले जात आहे.

रिपोर्ट्सनुसार, थलापति विजयच्या पॉलिटिकल करिअर विषयी चर्चा ही 11 जुलैपासून सुरु झाली आहे. त्याचं कारण म्हणजे थलापति विजयनं या काळात एका राजकारणी व्यक्तीची भेट घेतली होती. यासोबत थलापति विजय पदयात्रा करणार असल्याच्या चर्चा सुरु आहेत. या चर्चा सुरु झाल्यानंतर अशी माहिती समोर आली आहे की विजय त्याचं फिल्मी करिअरला तीन वर्षाचा ब्रेक घेतल्यानंतर राजकारणात प्रवेश करणार आहे.

दरम्यान, थलापति विजय लवकरच लियो या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा अॅक्शन थ्रिलर चित्रपट आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन लोकेश कनगराज यांनी केले आहे. लियो हा चित्रपट 19 ऑक्टोबर रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात विजय व्यतिरिक्त संजय दत्त, तृषा, अर्जुन, गौतम मेनन हे कलाकार देखील दिसणार आहेत. लियोनंतर थलापति विजय हा ‘वेंकट प्रभु’ या चित्रपटाचे चित्रीकरण करण्यास सुरुवात करणार आहे. तर ‘वेंकट प्रभु’ या चित्रपटासाठी थलापति विजय हा दिग्दर्शक शंकर यांच्यासोबत कार्यरत आहे. आतापर्यंत थलापतिनं फिल्मी करिअरमध्ये ब्रेक घेत पॉलिटिकल करिअर जॉइन करण्याच्या चर्चांवर काहीही प्रतिक्रिया दिलेली नाही. विजय 2024 मध्ये त्याची पॉलिटिकल पार्टी सुरु करणार असून 2026 च्या निवडणूकांमधून तो राजकारणात प्रवेश करेल, असे म्हटले जात आहे.

राजकारण प्रवेश करण्याच्या चर्चा सुरु असतानाच थलापति विजय हा वीएमआई म्हणजेच विजय मक्कल अयक्कमच्या सदस्यांना भेटला. पण जेव्हा तो तिथून निघाला तेव्हा त्याचे चाहते त्याचा पाठलाग करू लागले. विजयच्या चाहत्यांनी पनाईयुरपासून नीलंगराईमध्ये स्थित असलेल्या त्याच्या घरापर्यंत त्याचा पाठलाग केला. त्याच दरम्यान, विजयकडून एक मोठी चूक झाली. थलापति विजयनं चाहत्यांशी वाचण्यासाठी दोन पेक्षा जास्त ठिकामी रेड लाइट सिग्नल तोडले. त्यामुळे त्याला 500 रुपयाचा दंड ठोठावण्यात आला आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम