मुख्यमंत्री शिंदे यांच्या पाठीशी पूर्ण ताकदीने ; भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळे

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । १३ ऑक्टोबर २०२२ ।  राजकारणात गेल्या काही महिन्यापासून कोण कुणासोबत आहे, हे अद्यापही जनतेला कळत नाही, त्यानंतर शिवसेनेतून बाहेर आलेले शिंदे यांना बाळासाहेबांची शिवसेना हे नाव मिळाल्यानंतर विरोधकांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्यावर टीका केली, त्यावेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगतिले की, शिंदे यांच्या पाठीशी आम्ही पूर्ण ताकदीने उभे आहोत. आमच्या उमेदवाराच्या विजयासाठी जेवढी ताकद लागेल त्यापेक्षा १० पट जास्त ताकद आम्ही त्यांच्या प्रत्येक उमेदवाराला देणार आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हिंदुत्वासाठी मंत्रिपद सोडून उठाव केला. भाजपची त्यांच्या पक्षासोबत युती असून आम्ही शिंदे यांच्या पाठीशी अगदी ताकदीने उभे आहोत, असे वक्तव्य भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले. ते गोंदिया येथे पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी त्यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावरही शेलक्या शब्दात टीका केली.

नाना पटोले यांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील ‘बाळासाहेबांची शिवसेना’ पक्षाला मिळालेल्या चिन्हावरून टीका केली होती. बाळासाहेबांची ढाल करणे आणि मागून भाजपची तलवार चालवणे हेच शिंदे गटाचे चिन्ह, असे पटोले म्हणाले होते. यावर पत्रकारांनी प्रतिक्रिया विचारली असता बावनकुळे यांनी पटोलेंना टोला लगावला.

बावनकुळे म्हणाले, आमची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील ‘बाळासाहेबांची शिवसेना’ या पक्षासोबत युती आहे. त्यामुळे शिंदे यांच्या पाठीशी आम्ही पूर्ण ताकदीने उभे आहोत. आमच्या उमेदवाराच्या विजयासाठी जेवढी ताकद लागेल त्यापेक्षा १० पट जास्त ताकद आम्ही त्यांच्या प्रत्येक उमेदवाराला देणार आहे. नाना पटोले यांनी आमची काळजी करू नये. तुम्ही आता मशालीची, पंजाची आणि घडाळ्याची चिंता करावी. कमळ आणि ढाल–तलवार हे दोन्ही मिळून तुम्हाला अशी जागा दाखवू की २०२४ च्या निवडणुकीत महाविकास आघाडीला लढण्यासाठी उमेदवारही मिळणार नाही आणि हे तुम्ही माझ्याकडून लिहुन घ्या, असेही बावनकुळे म्हणाले.

 

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम