का येतो तुम्हाला अंगावर काटा ? जाणून घ्या कारण

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । १३ ऑक्टोबर २०२२ ।  तुम्हाला एखादा भीतीदायक व्हिडीओ दाखविला तेव्हा तुमची पहिली प्रतिक्रीया काय असते, अंगावर काटा उभा राहिला. किंवा एखादी भयानक घटना बघितली, आठवली तरी अंगावर काटा आला असं आपण म्हणतो. किंवा अगदी गार वारा सुटला तर अंगावर शहारा येतो. म्हणजे दोन वेगवेगळ्या घटना असल्या तरी आपलं शरीर एकसारखी प्रतिक्रीया देतं.

अंगावर काटा येणं म्हणजे काय?
शहारा येणं किंवा काटा येणं या प्रक्रीयेत अंगावरची बारिक लव, केस ताठ उभे राहतात.

असं का होतं?
त्वचेवरच्या बारिक बारिक पेशींच्या आकूंचन, प्रसरणाने शहारे येतात. यात काही पेशी आकुंचित झाल्याने आजूबाजूच्या पेशींमध्ये उठाव येतो. आपल्याला थंडी वाजल्यावरपण असं होतं. असा प्रकार जनावरांच्या बाबतपण घडतो.
शरीरात स्ट्रेस हार्मोन्स म्हणजेच ऐड्रेनलिन हार्मोन सबकाँशियस अवस्थेत रिलीज झाल्यावर शहारे येतात. जनावरांमध्ये हे त्यांना थंडी वाजल्यावर, ताणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाल्यावर रिलीज होतात. तर माणसात हे हार्मोन्स भीती, थंडी, भावनिक झाल्यावर व तणावपूर्ण परिस्थितीत रिलीज होतात. माणसांमध्ये ऐड्रेनलिन हार्मोन रिलीज झाल्यावर अश्रू निघणं, हाताला घाम फुटणे, छातीचे ठोके वाढणे, हात थरथरणे, ब्लड प्रेशर वाढणे, पोटात गोळा येतो असे बदल बघायला मिळतात.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम