आव्हाड व राऊत यांच्यावरील गुन्हे मागे घ्या; आम्ही शिंदे गटात येतो !
दै. बातमीदार । १४ नोव्हेबर २०२२ राज्यात शिंदे गटाची सत्ता आल्यापासून महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यावर विविध गुन्हे दाखल होत आहे, ठाकरे गटाचे संजय राऊत व आता राष्ट्रवादीचे नेते आ.जितेंद्र आव्हाड यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर नाशिक येथील ठाकरे गटाच्या माजी नगरसेविकेने थेट मुख्यमंत्री शिंदे यांना निवेदन पाठविले आहे. कि आम्ही शिंदे गटात येतो तुम्ही गुन्हे मागे घ्या.
आता नाशिकच्या ठाकरे गटाच्या एका माजी नगरसेविकेने यांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लक्ष करत या गोष्टीवरून त्यांच्यावर निशाना साधला आहे. संजय राऊत आणि जितेंद्र आव्हाडांवरील गुन्हे मागे घेतल्यास बिनशर्त शिंदे गटात प्रवेश करणार असल्याचे पत्र थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठवले आहे. त्यांच्या या उपरोधिक पत्राची आता चांगलीच चर्चा रंगली असून ते व्हायरल देखील होत आहे. शिंदे भाजप गट आणि महाविकास आघाडी यांच्यामध्ये राजकीय वॉर चांगलंच पेटलं आहे. पत्राचाळ प्रकरणी जेष्ठ नेते संजय राऊत जवळपास १०३ दिवस तुरुंगात होते. ते नुकतेच बाहेर आल्यानंतर आता जिंतेद्र आव्हाडांना मारहाण प्रकरणी पोलिसांनी अटक केली होती. त्यानंतर आज पुन्हा त्यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या सर्व गोदारोळात राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. यामुळेच विरोधक- सत्ताधारी यामधील काही नेते एकमेकांवर चिखलफेक करतांना दिसून येत आहेत. अशातच नाशिकमधील ठाकरे माजी नगरसेविकांनी मुख्यमंत्री शिंदे यांना थेट ऑफर बहाल केली आहे.
संजय राऊत आणि जिंतेद्र आव्हाड यांच्यावरील गुन्हे मागे घेतल्यास आम्ही शिंदे गटात प्रवेश करू असे पत्रच त्यांनी मुख्यमंत्र्यांना लिहले आहे. शिंदे-फडणवीस सरकार विरोधकांवर दबाव आणण्यासाठी विरोधकांवर सूडबुद्धीने खोटे गुन्हे दाखल करत असून विरोधकांचा आवाज दाबण्याचा काम हे सरकार करत आहे. अशा प्रकारचा सूर विरोधकांमध्ये निघत आहे. त्यात आता नाशिकच्या ठाकरे गटाच्या माजी नगरसेविका किरण गामणे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहिले आहे. संजय राऊत आणि जितेंद्र आव्हाडांवरील गुन्हे मागे घेतल्यास बिनशर्त शिंदे गटात प्रवेश करणार असून अन्य तीन सहकारी देखील माजी नगरसेविकांसोबत धूमधडाक्यात शिंदे गटात प्रवेश करणार असल्याचे त्यांनी पत्रात उल्लेखित केले आहे. नाशिकच्या ठाकरे गटाच्या माजी नगरसेविका किरण गामणे -दराडे म्हणतात कि, संजय राऊत आणि जितेंद्र आव्हाडांवरील गुन्हे मागे घेतल्यास बिनशर्त शिंदे गटात प्रवेश करणार आहोत. त्याचबरोबर अन्य तीन सहकारी माजी नगरसेविकांसोबत धूमधडाक्यात शिंदे गटात प्रवेश करेन असेही त्यांनी पत्रात म्हटले आहे. अशा पद्धतीने शिंदे भाजप गटातील नेते, महाविकास आघाडीतील नेत्यांमध्ये धुमशान पाहायला मिळत आहे. रोज नवे वाद बाहेर काढले जात आहेत. त्यामुळे नेमकं राज्यातील वातावरण कोणत्या दिशेने चालले आहे? असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडला आहे.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम