राजीनामा घेतला नसता तर भुजबळ तुरुंगात गेले असते ; शरद पवार
बातमीदार | ३० ऑगस्ट २०२३ | राष्ट्रवादीतून काही आमदारांसह अजित पवार बाहेर पडल्याने राजकारणात मोठी खळबळ उडाली होती. त्यानंतर शरद पवारांचे कट्टर कार्यकर्ते म्हणून ओळखले जाणारे मंत्री छगन भुजबळ हे देहील अजित पवारांच्या गटात गेल्याने शरद पवारांच्या गटाकडून त्यांच्यावर जोरदार टीका होत असतांना शरद पवारांनी मोठे विधान केले आहे. तेलगी प्रकरणात तेव्हा छगन भुजबळांचा राजीनामा घेतला नसता तर ते तुरुंगात गेले असते, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटले आहे.
तेलगी प्रकरणावरून शरद पवार यांनी आपला राजीनामा घेतला. पण, आपणच तेलगीविरोधात कारवाई केली होती, असे मंत्री भुजबळ बीडमधील सभेत म्हणाले होते. शरद पवार यांनी मुंबईतील पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत बोलताना त्याला उत्तर दिले. मी लढण्यासाठी तयार आहे तुम्हीदेखील लढायला तयार राहा. ही विचारांची लढाई आहे. विचारांची लढाई विचारांनीच लढाईची आहे. संभ्रम ठेवू नका, लोकशक्ती ही आपल्याच मागे आहे. माझ्यावर टीका करणाऱ्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटाकडे लक्ष देऊ नका, असेही पवार म्हणाले.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम