रावेर बाजार समितीवर महाविकास आघाडीचे दणदणीत विजय !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । ३० एप्रिल २०२३ ।  जिल्ह्यातील सर्वच बाजार समितीचा निकाल जाहीर होत आहे. त्यातील एक बाजार समिती म्हणजे रावेर कृषी उपन्न बाजार समितीच्या निवडणुकीत अठरा जागांपैकी महाविकास आघाडीच्या शेतकरी विकास पॅनलला 13 जागा तर भाजपा पुरस्कृत लोकमान्य शेतकरी पॅनला तीन जागा तर अपक्ष दोन जागांवर विजयी झाले. प्रहार जनशक्तीच्या परिर्वतन शेतकरी पॅनला खात सुध्दा उघडता आले नाही. शनिवरी मतमोजणीस्थळी निकाल ऐकण्यासाठी मोठी गर्दी झाली होती.

निवडणूक निरीक्षक तथा तहसीलदार बंडू कापसे यांच्या उपस्थितीत निवडणूक निर्णय अधिकारी विजयसिंह गवळी यांच्या मार्गदर्शनास्वामी विवेकानंद विद्यालयात सात टेबलांवर मतमोजणी झाली. यावेळी सचिव गोपाळ महाजन, कमलेश पाटील, संतोष तायडे मतमोजणीच्या प्रक्रियेत सहकार्य केले. निकालानंतर विजयी उमेदवारांच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम