राज्यातील या जिल्ह्याल ‘यलो अलर्ट’ जारी

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । ४ मे २०२३ ।  राज्यात बदलत्या हवामानामुळे शेतकरी मोठ्या चिंतेत आला आहे. त्यामुळे अनेक मोठ मोठे नुकसान देखील होत आहे. सरकार अजूनही अनेक ठिकाणी मदतीसाठी पोहचले नसून शेतकरीकडे साफ दुलर्क्ष होत आहे. अशातच पुन्हा एकदा हवामान खात्याच्या अंदाजामुळे शेतकरीमध्ये चिलबिचल दिसून आली आहे. राज्यात पुढील ४ ते ५ दिवसांसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला असून यादरम्यान वादळी वाऱ्यासह ढगांचा गडगडाट आणि मुसळधार पाऊस होईल अशी माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली आहे.

हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार, यावेळी सगळ्यात जास्त पावसाचा तडाखा हा विदर्भाला बसणार आहे. तर कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी वाऱ्याचा वेग ताशी ३० ते ४० किलोमीटर असेल. यावेळी मेघगर्जना आणि विजांसह पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. पुणे आणि आसपासच्या परिसरात आज गारा पडण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या शेतमालाची काळजी घ्यावी आणि योग्य ठिकाणी धान्याची विल्हेवाट लावावी अशा सूचना देण्यात आला आहेत.

हवामान खात्याच्या अंदाजानुसार, आज विदर्भातही धुवांधार पाऊस होण्याची शक्यता आहे. विदर्भासह मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज आहे. अधिक माहितीनुसार, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यामध्ये पुढचे २ दिवस तर विदर्भामध्ये पुढचे ३ दिवस ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. यामुळे सध्या कमाल तापमानात घट झाली असून वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. राज्यात मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर, जालना, उस्मानाबाद, बीड, नांदेड आणि हिंगोली या जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर जळगावमध्ये तुफान पाऊस झाला असून पुढचे काही दिवसही जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. उत्तर महाराष्ट्रात जळगाव, नाशिक, नंदूरबार, अहमदनगर आणि धुळे या जिल्ह्यांमध्ये पावसाचा इशारा देण्यात आला असून पुढचे २४ तास या जिल्ह्यांसाठी महत्त्वाचे असणार आहेत.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम