राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या अमित शहांसोबत तीन बैठका ; कॉंग्रेसच्या नेत्याचा गोप्यस्फोट !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । ४ मे २०२३ ।  राज्यातील राजकारणात गेल्या दोन दिवसापासून राष्ट्रवादी पक्षातील प्रत्येक हालचालीवर जनता लक्ष ठेवून असतानाच राज्यातील कॉंग्रेसच्या नेत्याने मोठे विधान केल्याने महाविकास आघाडीसह राजकारण तापले आहे. शरद पवारांच्या राजीनाम्याचे वेगवेगळे अर्थ काढले जात असतानाच दुसरीकडे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे.

राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यांच्या अमित शाह यांच्यासोबत तीन बैठका झाल्याचं पृथ्वीराज चव्हाण म्हणाले आहेत. ‘काही नेत्यांच्या भाजपच्या नेत्यांसोबत बैठकी सुरू आहेत, अशा बातम्या वर्तमानपत्रात आपण सर्वांनी पाहिल्या आहेत. त्या बातम्यांचं कुणी खंडन केलेलं नाही. मी आणखी खोलात जाऊन पत्रकारांना विचारलं, तेव्हा अमित शाहंसोबत राष्ट्रवादीच्या ज्येष्ठ नेत्यांच्या तीन-तीन बैठका झाल्या आहेत, असं कळलं’, असं पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.

‘शिंदे सरकारवर सुप्रीम कोर्टातून आघात झाला, निलंबनाच्या खटल्यात शिंदेंविरोधात निकाल गेला आणि 16 आमदार निलंबित झाले, तर महाराष्ट्राला नवा मुख्यमंत्री लागेल. तो मुख्यमंत्री बाहेरून घ्यायचा का? राष्ट्रवादी काँग्रेसमधूीन घ्यायचा का? अशा अटकली चालल्या आहेत. या सगळ्या जगजाहीर अटकली आहेत’, असा दावाही पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे.

राष्ट्रवादीची प्रतिक्रिया पृथ्वीराज चव्हाण यांचा हा दावा राष्ट्रवादीने फेटाळून लावला आहे. पृथ्वीराज चव्हाणांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. पत्रकारांनी सांगितलं असं ते ऐकिव माहितीच्या आधारावर बोलत आहेत. राष्ट्रवादीची भाजपसोबत अशी कोणतीही बैठक झालेली नाही. राष्ट्रवादी महाविकासआघाडीसोबत आहे, युपीएसोबत आहे. मोदी सरकारच्या विरोधात आहे. अशा बातम्या चुकीच्या आहेत, त्यांना काहीही आधार नाही. भाजपसोबत घरोबा करणार नाही, असं ठामपणे शरद पवारांनी सांगितलं, त्यामुळे याला पूर्णविराम मिळाला आहे, असं राष्ट्रवादीचे प्रवक्ते महेश तपासे यांनी स्पष्ट केलं आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम