भारतातून आलेली योग जुनी कॉपीराइट फ्री संस्कृती !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । २२ जून २०२३ ।  अमेरिकेच्या तीन दिवसांच्या दौऱ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बुधवारी यु एन हेडक्वार्टरमध्ये योग दिनाच्या सोहळ्याचे नेतृत्व केले. यावेळी मोदींनी योगमुले जग एकत्र आल्याचे म्हटले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यावेळी म्हणाले की, योगचा अर्थ आहे- युनाइट. मी 9 वर्षांपूर्वी 21 इथेच आंतरराष्ट्रीय योग दिनाचा प्रस्ताव ठेवला होता. हा अंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यासाठी संपूर्ण जग भारताबरोबर एक झाले. योग भारतातून आलेला आहे. ही भारताची जुनी संस्कृती असून ती कॉपीराइट फ्री आहे, असे मोदी म्हणाले.
तुम्ही योग कुठेही करू शकता. ते सर्वांसाठी सर्व संस्कृतींसाठी आहे. ही जीवन जगण्याची पद्धत आहे, असंही मोदी म्हणाले. योग स्वतःबरोबर जगाबरोबर शांततेने जगण्याचा योग्य मार्ग शिकवतो, असंही मोदी म्हणाले. हा कार्यक्रम यूएनच्या नॉर्थ लॉनवरील गार्डनमध्ये होत आहे. यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी याठिकाणी पोहोचले. न्यूयॉर्कचे महापौर एरिक अॅडम, शेफ विकास खन्ना, संयुक्त राष्ट्र महासभेच्या अध्यक्षा साबा कोरोसी यांच्यासह 180 देशांतील लोक सहभागी झाले आहेत.
लॉनमधील महात्मा गांधींच्या पुतळ्याला पंतप्रधानांनी पुष्प अर्पण केले. तत्पूर्वी सकाळी पंतप्रधान मोदींनी योग दिनाच्या शुभेच्छा दिल्या. ते म्हणाले होते- योग दिनी अनेक जबाबदाऱ्यांमुळे मी तुमच्यामध्ये नाही. मी तुमच्यासोबत योग करत नसलो तरी योग करण्याच्या कर्तव्यापासून मी पळत नाही. ते म्हणाले की, योग जगाला जोडत आहे. साधारण 1985 सालची गोष्ट आहे. भारताला जगात नवी ओळख देण्यासाठी राजीव गांधींनी अमेरिकेत ‘फेस्टिव्हल ऑफ इंडिया’ हा कार्यक्रम सुरू केला. भारतातील विविध संस्कृती आणि सणांची माहिती जगाला व्हावी, हा त्यामागचा उद्देश होता.

जून 1985 मध्ये या योजनेअंतर्गत राजीव गांधींनी फ्रान्सची राजधानी पॅरिसमध्ये एका भव्य कार्यक्रमाचे आयोजन केले होते. त्यात पतंग उडवण्याच्या कार्यक्रमांपासून भारतीय चित्रपट आणि खाद्यपदार्थांपर्यंत सर्व गोष्टींचा समावेश होता. इंडिया टुडेच्या वृत्तानुसार, पॅरिसमधील २ लाख लोकांनी यात भाग घेतला. राजीव गांधी म्हणाले होते – पॅरिसमध्ये सर्व काही आहे, पण आपण संपूर्ण भारत इथे आहे.
परराष्ट्र व्यवहार तज्ञांनी राजीव यांच्या या प्रयत्नाला भारताची सांस्कृतिक मुत्सद्दीगिरी असे म्हटले होते. तब्बल 29 वर्षांनंतर पुन्हा एकदा भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी योगाचा सांस्कृतिक मुत्सद्देगिरी म्हणून उपयोग करून जगामध्ये भारताला नवी ओळख दिली. 2022 मध्ये जगातील 192 देशांनी योग दिन साजरा करून या मुत्सद्देगिरीच्या यशावर शिक्कामोर्तब केले.

27 सप्टेंबर 2014 रोजी पंतप्रधान मोदी यांनी संयुक्त राष्ट्र संघात प्रथमच दरवर्षी आंतरराष्ट्रीय स्तरावर योग दिन साजरा करण्याचा प्रस्ताव मांडला. फोर्ब्सच्या म्हणण्यानुसार, मोदींच्या या भाषणातून हे स्पष्ट झाले होते की, भारत आता खुलेआम योगाचा वापर डिप्लोमेसी म्हणून करत आहे. 11 डिसेंबर 2014 रोजी, संयुक्त राष्ट्रातील भारतीय राजदूत अशोक मुखर्जी यांनी आंतरराष्ट्रीय योग दिनाचा प्रस्ताव मांडला. यानंतर पाकिस्तानने भारताच्या या प्रस्तावाला पाठिंबा दिला नाही. आंतरराष्ट्रीय योग दिनाचा ठराव पास व्हावा असे पाकिस्तानला वाटत नव्हते. या प्रस्तावाला आधीच संयुक्त राष्ट्रांच्या १७७ देशांचा पाठिंबा होता.

पाकिस्तानची इच्छा नसतानाही मुस्लिम देशांची संघटना असलेल्या ओआयसी च्या 56 पैकी 48 देशांनी भारताला पाठिंबा दिला. एवढेच नाही तर आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या प्रस्तावावर चीननेही पाकिस्तानऐवजी भारताला पाठिंबा दिला. अशा प्रकारे मतदानाशिवाय भारताचा हा प्रस्ताव संयुक्त राष्ट्रात एकमताने मंजूर करण्यात आला. तेव्हा भारताने योग डिप्लोमेसीच्या माध्यमातून पाकिस्तानला आंतरराष्ट्रीय पटलावर एकाकी पाडले होते. त्याच वेळी, 2018 मध्ये भारत आणि चीनच्या लष्करामध्ये डोकलाम वाद झाला होता. असे असूनही, एक वर्षानंतर, 21 जून 2019 रोजी, भारत आणि चीनच्या सैनिकांनी गुवाहाटीमध्ये एकत्र आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा केला. त्यानंतर योग डिप्लोमसीच्या माध्यमातून दोन्ही देशांच्या लष्करांमधील तणाव कमी करण्याचा प्रयत्न करण्यात आला.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम