पक्ष संघटनेत जबाबदारी द्या ; अजित पवार !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । २२ जून २०२३ ।  राज्यातील महाविकास आघाडीतील प्रमुख पक्ष असलेल्या राष्ट्रवादीत गेल्या काही दिवसापासून अंतर्गत वाद सुरु असल्याच्या घटना सातत्याने बाहेर येवू लागल्या आहेत. आत अजित पवार यांनी विरोधी पक्षनेते पद मला नको असे म्हणाल्याने पुन्हा एकदा वाद चव्हाट्यावर आला आहे.

विरोधी पक्षनेतेपद नको, पक्ष संघटनेत जबाबदारी द्या, मग पक्ष कसा चालतो हे दाखवतो, पक्ष संघटनेत कुठलेही पद द्या, त्या पदाला न्याय देऊन दाखवतो, असे वक्तव्य करुन विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदावर आपली नजर असल्याचे संकेत दिले. ते राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुंबईतील मेळाव्यात बोलत होते.
आपण कधी एकट्याच्या ताकदीवर महाराष्ट्रात सत्ता आणू शकलो का? आपला पक्ष 24 वर्षे पूर्ण करुन 25 व्या वर्षांत पाय ठेवत आहे. मात्र, पक्ष विदर्भात आणि मुंबईत कमी पडतो आहे, असे म्हणत विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचे कान टोचले आहेत. तर अजूनही आपला मुंबईत अध्यक्ष नाही आपल्याला निर्णय घेण्यासाठी दिल्लीत जाण्याची गरज नाही म्हणत ज्येष्ठ नेत्यांनाही टोला लगावला आहे. दरम्यान मुंबईमध्ये बोलत असताना विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, यांच्यावर राज्यात होणाऱ्या दंगली, गुंडांकडून होणारे गाड्याचे नुकसान यासह जातीय सलोखा बिघडवण्याचा प्रयत्न अशा अनेक विषयावर हल्लाबोल केला आहे.

विरोधी पक्षनेते अजित पवार जळगावमधून बोलताना म्हणाले की, आपण कधी एकट्याच्या ताकदीवर महाराष्ट्रात सत्ता आणू शकलो का? आपला पक्ष 24 वर्षे पूर्ण करुन 25 व्या वर्षांत पाय ठेवत आहे. मात्र, पक्ष विदर्भात आणि मुंबईत कमी पडतो आहे. अजूनही मुंबईचा अध्यक्ष नाही आपल्याला, आपल्याला निर्णय घेण्यासाठी दिल्लीत जाण्याची गरज नाही. आपण आत्मचिंतन करण्याची गरज असल्याचे म्हणत अजित पवारांनी कार्यकर्त्यांचे कान टोचले आहे. पक्षातील सेलमध्ये बदल करायची गरज आहे, भाकरी जर फिरवायची असेल तर फिरलीच पाहिजे, त्यात कुणाचा हस्तक्षेप येते मला समजलेच नाही असा सवाल अजित पवारांनी उपस्थित केला आहे. वय झालेल्या लोकांना फादर बॉडीत घेतले पाहिजे असेही अजितपवारांनी म्हटले आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम