योगगुरू रामदेव बाबा अडचणीत; समन्स जारी !
दै. बातमीदार । ७ डिसेंबर २०२२ । योगगुरु रामदेव बाबा यांच्यासह त्यांचे सहकारी आचार्य बाळकृष्ण यांच्या अडचणीत वाढ झालेली आहे. त्यांच्या विरोधात बिहार येथे फसवणूक प्रकरणी समन्स जारी करण्यात आलं आहे. बेगुसराय जिल्हा न्यायालयाच्या न्यायदंडाधिकारी मोहिनी कुमारी यांनी निंगा गावातील रहिवासी तक्रारदार महेंद्र शर्मा यांनी दाखल केलेल्या तक्रार पत्रावर सुनावणी करताना योगगुरू बाबा रामदेव आणि बाळकृष्ण यांना कलम 420 आणि 417 अंतर्गत समन्स बजावण्याचे आदेश दिले.
मिळालेल्या माहितीनुसार, न्यायालयानं बाबा रामदेव आणि बालकृष्ण यांना 12 जानेवारीपर्यंत न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. खरं तर, 18 जून 2022 रोजी बरौनी पोलीस स्टेशन (Barauni Police Station) परिसरातील निंगा गावामधील रहिवासी महेंद्र शर्मा यांनी बाबा रामदेव आणि बाळकृष्ण यांच्याविरोधात सीजीएम कोर्टात (CGM Court) तक्रार दाखल केली होती. याप्रकरणी पैसे घेऊनही उपचार केले जात नसल्याचा आरोप तक्रारदारानं केला होता.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम