
दै. बातमीदार । १५ मे २०२३ । प्रत्येक महिलेच्या आयुष्यातील महत्वाचा क्षण असतो तो म्हणजे पहिल्यांदा आई होणे, त्यासाठी प्रत्येक महिला आपल्या आरोग्याची काळजी घेत असते. त्या महिलेचा हा दुसरा जन्म असतो व तिच्याकडून एक पुन्हा जन्म होत असतो, जर तुम्ही पहिल्यांदा आई होणार असाल तर तुमच्यासाठी खास टिप्स आम्ही घेऊन आलो आहोत.
मुलाच्या जन्मासोबत आर्थिक खर्चही वाढतो. अशा वेळी, आम्ही तुम्हाला अशा टिप्सबद्दल सांगत आहोत ज्या प्रत्येक नवीन आईने फॉलो केल्या पाहिजेत. याद्वारे त्या स्वतःला आर्थिकदृष्ट्या तयार करू शकतात. मूल जन्माला येण्यापूर्वीच आजकाल डॉक्टरांची फीस, मेडिकल टेस्ट, खाण्यापिण्याचा खर्च इत्यादी अनेक प्रकारचे खर्च होतात. या सर्व गोष्टींसाठी पहिलेच फंड जमा करणं आवश्यक आहे. बाळाच्या जन्मानंतरही मेडिकल चेकअप, बाळाचे जेवण, लसीकरण आदी अनेक खर्च होतात. या सगळ्यासाठी आधीच बजेट तयार करा. यासोबतच तुमच्या विमा कंपनीशी बोला की डिलीव्हरीचा हॉस्पिटल खर्च तुमच्या इन्शुरन्स प्लानमध्ये समाविष्ट आहे की नाही. हा खर्च कव्हर करणारी आरोग्य विमा योजना खरेदी करण्याचा प्रयत्न करा.
अनेक वेळा मुलाच्या जन्मानंतर आईला तिच्या करिअरमधून काही दिवस ब्रेक घ्यावा लागतो. अशा वेळी घरखर्चाचे नियोजन करण्यासाठी पार्टनरसोबत मिळून खर्च मॅनेज करणे आवश्यक आहे. यामध्ये मुलाच्या जन्मानंतर वाढणाऱ्या खर्चाचा समावेश करा.या सर्व गोष्टींसह, बेबी प्लानिंगपूर्वीच वेगवेगळ्या स्किम्समध्ये गुंतवणूक करा. जेणेकरुन मुलाच्या जन्मानंतर तुम्हाला कोणत्याही प्रकारच्या पैशाशी संबंधित समस्या जाणवणार नाहीत.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम