दिल्लीत आपने भाजपला विजयापासून रोखले ; मनपावर आपची सत्ता !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । ७ डिसेंबर २०२२ ।  देशाचे लक्ष लागून असलेल्या दिल्ली महानगरपालिकेत अखेर आम आदमी पार्टीने बाजी मारली आहे. ४ डिसेंबर रोजी पार पडलेल्या मतदानानंतर आज मतमोजणी पार पडली. मागील १५ वर्षांपासून दिल्ली महापालिकेवर भाजपाची सत्ता होती.

आपने 171 जागा जिंकत आपने दिल्ली महानगरपालिकेवर आपला झेंडा फडकवला आहे. तर भाजपला 107 जागांवर समाधान मानावं लागलं आहे.रविवारी ४ डिसेंबर रोजी दिल्ली महानगरपालिका निवडणुकीसाठी मतदान पार पडलं. या निवडणुकीत ५०.४७ टक्के मतदान झाले. दिल्ली महापालिकेच्या निवडणुकीत २५० प्रभागांमध्ये एकूण १३४९ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत.  दिल्ली महापालिका निवडणुकीत १.४५ कोटी मतदार आहेत. 2017 मध्ये, भाजपने तत्कालीन 270 पैकी 181 नगरपालिका वॉर्ड जिंकले होते, तर AAP फक्त 48 जिंकले होते. कॉंग्रेस 30 जागा जिंकून तिसऱ्या स्थानावर होती.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम