पैसे गुंतवणूक करून मिळणार दुप्पट ; वाचा सविस्तर

बातमी शेअर करा...

बातमीदार | ३१ ऑक्टोबर २०२३

प्रत्येक व्यक्ती महिन्याकाठाला थोडे फार पैसे अनेक ठिकाणी गुंतवणूक करीत असतो पण हेच पैसे सुरक्षित राहावेत आणि भविष्यात योग्य रक्कम मिळावी अशी प्रत्येक गुंतवणूकदाराची अपेक्षा असते. यासाठी अनेक पर्याय निवडले जातात. याचा विचार करून सध्या पोस्टाने पोस्ट ऑफिस डिपॉझिट योजना सुरू केली आहे. तुम्ही जर गुंतवणुकीचा विचार करत असाल तर या योजनेत गुंतवणूक केलेली रक्कम निश्चित वेळेत दुप्पट होते आणि सुरक्षितही राहते. सध्या या योजनेला ग्राहकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे.

ग्राहकांच्या गुंतवणुकीवर बँकांपेक्षाही जास्त व्याज दिलं जात आहे. सरकार या योजनेतंर्गत ७.५ टक्के व्याज देत आहे. वेगवेगळ्या कालावधीसाठी गुंतवणूक करता येऊ शकते. एका वर्षाच्या गुंतवणुकीवर ६.९ टक्के व्याज, २ आणि ३ वर्षांसाठी ७ टक्के आणि ५ वर्षाच्या गुंतवणुकीवर ७.५ टक्के व्याज मिळणार आहे. मात्र, गुंतवणूक केलेली रक्कम दुप्पट होण्यासाठी ५ वर्षांपेक्षा अधिक कालावधी लागतो.

पोस्ट कार्यालयात या योजनेंतर्गत १० वर्षांपेक्षा जास्त वयाच्या मुलाचं खातं उघडता येतं. किमान १ हजार रुपयांमध्ये सिंगल किंवा जॉईंट अकाउंट उघडता येतं. या खात्यात जमा केलेल्या रकमेवर व्याजाची रक्कम वार्षिक आधारावर मिळणार आहे. गुंतवणूक केलेल्या रकमेवर ७. ५ टक्के व्याज मिळणार आहे मात्र जर टाईम डिपॉझिट योजनेत गुंतवणून केली तर अधिक परतावा मिळणार आहे. ही रक्कम ११४ महिन्यांनी म्हणजेच ९. ६ वर्षांनी दुप्पट होईल. या योजनेत गुंतवणूक केलेल्या ग्राहकांना भारत सरकारकडून आयकर विभागामार्फत सवलतीही देण्यात येणार आहेत.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम