तुमचा फोन होतोय डिस्चार्ज ‘हे’ असू शकते कारण !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । १८ जुलै २०२३ ।  सध्या प्रत्येक व्यक्तीकडे मोबाईल हा असतोच. तर अनेकांच्या मोबाईलला सर्वात मोठा त्रास असतो तो म्हणजे फोन डिस्चार्ज झाला तर तो फक्त रिकामा डब्बा असतो. कारण फोन डिस्चार्ज होणे म्हणजे फोन बंद होतो. म्हणूनच फोन बंद होऊ नये म्हणून प्रत्येक व्यक्ती त्याच्या चार्जिंगची काळजी घेत असते.पण अनेकदा चार्जिंगसाठी दुसऱ्यांचा चार्जर वापरला जातोय. याने नेमकं काय होतं हे आपण जाणून घेऊया.

अनेकदा असं होतं की बाहेर जाताना आपण फोन चार्ज करायला विसरतो आणि मग दिवसभर ऑफिसमध्ये काम असल्याने फोन डिस्चार्ज होतो. फोन ऑन करण्याची वेळ आला की मग अनेकजण कोणाकडून तरी चार्जर मागवून फोन चार्ज करतात.

अनेकदा आपलं चार्जर वेळेवर सापडत नाही. मग आपण दुसऱ्याच्या चार्जरने चार्ज करतो. पण असं करणं योग्य आहे का? फोन दुसऱ्याच्या चार्जरने चार्ज केला की तो खराब होतो हे आपण अनेकदा ऐकले आहे. पण काही लोक म्हणतात की याने काही फरक पडत नाही. चला तर मग जाणून घेऊया असं केल्याने नेमकं काय होतं.. याचं खरं कारण म्हणजे तुमच्या फोनसोबत येणारा चार्जर खास तुमच्या फोनची बॅटरी चार्ज करण्यासाठी डिझाइन केलेला आहे. यात तुमच्या फोनसाठी योग्य आकार, योग्य व्होल्टेज आहे आणि ते योग्य प्रकारच्या कनेक्टरही दिलं जातं.
दुसर्‍या फोनचा चार्जर वापरला तर? वेगळा चार्जर वापरल्याने विविध समस्या उद्भवू शकतात. उदाहरणार्थ, दुसर्‍या चार्जरचा व्होल्टेज खूप जास्त असल्यास ते तुमच्या फोनची बॅटरी खराब करू शकते. दुसरीकडे, जर व्होल्टेज खूप कमी असेल, तर तो तुमचा फोन अजिबात चार्ज करणार नाही. चुकीच्या व्होल्टेजसह चार्जर वापरल्याने तुमच्या फोनची बॅटरी जास्त गरम होऊ शकते, ज्यामुळे आग लागण्याची शक्यता असते. म्हणून, सल्ला दिला जातो की तुम्ही तुमच्या फोनसोबत आलेला चार्जर वापरा किंवा त्याच मॅनुफॅक्चरकडून नवीन चार्जर खरेदी करा.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम