जि.प.च्या १,७४६ शिक्षकांच्या वैद्यकीय बिलांसाठी १३ कोटी ४० लाखांचा निधी
जि.पच्या प्राथमिक शिक्षण विभागाला प्राप्त
बातमीदार l बुधवार दि. २८ फेब्रुवारी २०२४
जळगाव ;- वैदयकिय बिलांची प्रतिपुर्ती मिळत नसल्याने शिक्षकांमध्ये नाराजीचा सुर उमटत असतांना शासनाने वैदयकिय बीलांसाठी तब्बल १३ कोटी ४० लाखांचा निधी दिला असुन तो जि.पच्या प्राथमिक शिक्षण विभागाला प्राप्त झाला आहे.
या निधीतून जिल्हयातील १७४६ शिक्षकांची व १९ केंद्र प्रमुखांची वैदयकिय बिले येत्या आठवडाभरात खात्यावर जमा होणार असल्याची माहीती प्राथमिक शिक्षणाधिकारी विकास पाटील यांनी दिली आहे.
जि.प शाळांमध्ये कार्यरत असलेल्या शिक्षकांना वैदयकिय समस्या आल्यानंतर त्यांना हॉस्पीटलचे बील सादर करून व प्रशासकीय कागदपत्रांची पुर्तता केल्यानंतर या बीलांची प्रतीपुर्ती मिळत असते.
गेल्या काही वर्षापासून वैदयकिय बीलांसाठी शिक्षकांना शिक्षण विभागाच्या खेट्या माराव्या लागत होत्या. मात्र शासनाने नुकतेच जि.पला १३ कोटी ४० लाख २५ हजाराचा निधी वैदयकिय बिलांसाठी दिला आहे.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम