चोपडा बांधकाम विभागात टक्केवारीचा कारभार

ठेकेदारांकडून टक्केवारीची रक्कम फोन पे ने घेणारे मस्तवाल अधिकारी कोण?

बातमी शेअर करा...

चोपडा बांधकाम विभागात टक्केवारीचा कारभार

ठेकेदारांकडून फोन पे ने टक्केवारीची रक्कम घेणारा मस्तवाल अधिकारी कोण?

चोपडा । प्रतिनिधी
येथील सार्वजनिक बांधकाम विभागात कनिष्ठ अभियंत्यापासून, उप अभियंता व लेखा परीक्षक (ऑडिटर) हे ठेकेदारांना वेठीस धरून अगोदर टक्केवारी दया मगच कामे होतील अशी अशी आडमुठे धोरण अवलंबून

टक्केवारीची रक्कम चक्क फोन पे ने स्विकारीत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस येत आहे. त्यामुळे या मस्तवाल अधिकाऱ्यांची पाठराखण करणारा अधिकार कोण? अशी चर्चा सोमवारी दिवसभर सार्वजनिक बांधकाम विभागात होती.

या बाबत सविस्तर माहिती अशी कि, चोपडा विधानसभा क्षेत्राचे कार्यसम्राट आमदार प्रा. चंद्रकांत अण्णा सोनवणे यांनी गेल्या दशकात विकास कामांना गती दिली.

तसेच गेल्या अडीच वर्षात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात न भूतो न भविष्यती अशी सुमारे 4000 कोटी रुपयांची विकास कामे प्रत्यक्षात करून दाखविली, त्यामुळे मोठ्या मताधिक्याने मतदारांनी त्यांना पुन्हा तिसऱ्यांदा निवडून दिले.

दरम्यान मस्तवाल अधिकारी मात्र जास्तीची कामे करावी लागतात, आम्हाला वेळ नाही, अगोदर टक्केवारी दया मगच बिल पुढे सरकेल, रोख नसतील तर फोन पे करा अशा ऐन केन प्रकारे ठेकेदारांना वेठीस धरून पिळवणूक केली जात आहे.

अगोदरच बँकेची कर्जे, त्यातच शासनाकडून निधी नसल्याने वर्ष – वर्ष रक्कम अडकलेली अजून अधिकाऱ्यांची टक्केवारी यामुळे ठेकेदार त्रस्त झाले आहेत.

अगोदर टक्केवारीची रक्कम दया मगच बिल पुढे जाईल

या भ्रष्ट अधिकाऱ्यांनी टक्केवारीची रक्कम चक्क फोन पे ने घेत असल्याची माहिती एका ठेकेदाराने आमच्या प्रतिनिधीस दिली आहे. फोन पे ने टक्केवारीची रक्कम स्वीकारणारे ते अधिकारी कोण? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

या मस्तवाल अधिकाऱ्यांची पाठराखण करणारा अधिकारी कोण ? यांची एवढी हिम्मत कशी वाढली? याचा आमच्या प्रतिनिधीने आढावा घेतला असता सदरचा प्रकार हा सुमारे

2-3 वर्षांपासून सर्रास पणे सुरु असल्याचे उघडकीस आले आहे. याचे संपूर्ण पुरावे आमच्या प्रतिनिधी च्या हाती लागले असून संबंधित अधिकाऱ्यांची बँक खात्यांची चौकशी केल्यास दूध का दूध पाणी का पाणी झाल्याशिवाय राहणार नाही.

लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडून चौकशीची मागणी 

संबंधित अधिकाऱ्यांची लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडून चौकशी होणे गरजेचे असल्याचे बोलले जात आहे. या टक्केवारीच्या प्रक्रियेत शाखा अभियंता, क्लर्क, उपअभियंता हे साखळी पद्धतीने ठेकेदारांना वेठीस धरत असल्याचा धक्कादायक प्रकार आहे.

त्या मध्ये ‘बालाजी’ नामक कनिष्ठ अभियंता तर ‘कुंदन कोळी’ नामक ऑडिटर यांच्यावर टक्केवारीचा आरोप ठेकेदारांकडून करण्यात येत आहे. तसेच सदर टक्केवारी ची रक्कम आम्हाला ‘मॅडम’ ला देखील द्यावी लागते, असे सांगितले जाते.

कारवाईत दिरंगाई का?

चोपडा बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता स्वाती सुराणा यांना या प्रकाराची कल्पना असूनही त्यावर कारवाई होत नाही, या मागील गौडबंगाल काय? याबाबतही संभ्रम निर्माण झाला आहे.

कारवाईत दिरंगाई होत असल्याने कार्यकारी अभियंता सुराणा मॅडम यांच्यावरही भ्रष्टाचाराचा ठपका ठेवला जात आहे.

या प्रकरणावर अधीक्षक अभियंता प्रशांत सोनवणे यांच्याकडे वारंवार तक्रारी होत असुनही त्यावर कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही, असा आरोप केला जात आहे.

या प्रकरणी कार्यकारी अभियंता स्वाती सुराणा यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी सर्व प्रकाराची माहिती घेऊन चौकशी करणार असल्याचे दै. बातमीदार शी बोलतांना सांगितले.

सार्वजनिक बांधकाम विभाग विश्वास हरवतोय

विकास कामांच्या गती साठी अस्तित्वात आलेला चोपडा सार्वजनिक बांधकाम विभाग आता भ्रष्टाचाराच्या आरोपांनी चर्चेत आहे. यामुळे या विभागावरील विश्वास कमी होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम