जनरेटर चोरीच्या आरोपींना ४८ तासातच अटक,

जनरेटर चोरीच्या आरोपींना ४८ तासातच अटक,भडगाव पोलिसांची कारवाई कजगाव ता भडगाव येथे दिनांक २४ च्या मध्यरात्री कजगाव पारोळा रस्त्यावरील उड्डाण पुलावर आठ लाख रुपये किमतीचे जनरेटर चोरीचा प्रयत्न करण्यात आला होता पाहरेकरीला जाग आल्याने चोरट्यांचा प्रयत्न फसला व ते पळून जाण्यास यशस्वी ठरले होते मात्र भडगाव पोलिसांनी चोरीला ४८ तास होत नाही तोच आरोपींना अटक करून बेड्या ठोकल्या आहेत चोरीतील आरोपींची नावे कुमारसिंग विजयसिंह राजपूत वय २३ वर्ष रा चाळीसगाव , गणेश महेंद्र पवार वय २१ वर्ष रा चाळीसगाव, ऋषिकेश राहुल कासार वय१८ वर्ष ८ महिने रा चाळीसगाव वाल्मिक ऊर्फ रमेश सोमनाथ सुपेकर वय २० , अशी आरोपींची आहे आरोपींवर भा. द.वि.कलम ३७९.व ५११ प्रमाणे गुन्हा नोंद केला असून पुढील तपास भडगाव पोलीस निरीक्षक अशोक उतेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस करीत आहेत पोलीस निरीक्षक अशोक उतेकर यांच्या सुचनेने सहाय्यक फौजदार छबूलाल नागरे पोलीस हवालदार जिजाबराव पवार पोलीस नाईक नरेंद्र विसपुते पोलीस कॉन्स्टेबल प्रकाश गवळी गणेश कुमावत जगन्नाथ महाजन स्वप्नील चव्हाण यांनी परिश्रम घेतले गुन्ह्यासाठी वापरले ट्रक्टर आधीच पोलिसांनी हस्तगत केले आहे ४८तासांतच पोलिसांनी चोरीच्या गुन्ह्याचा तपास केल्याने आता तरी वाढत्या चोऱ्या थांबतील अशी अपेक्षा ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे

बातमी शेअर करा...

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम